रिक्षाचालकावर हल्ला करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:40 IST2021-05-14T04:40:08+5:302021-05-14T04:40:08+5:30

डोंबिवली: रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद सुभाष खाडे उर्फ जगन्नाथ असे आरोपीचे ...

Arrested for attacking autorickshaw driver | रिक्षाचालकावर हल्ला करणाऱ्यास अटक

रिक्षाचालकावर हल्ला करणाऱ्यास अटक

डोंबिवली: रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद सुभाष खाडे उर्फ जगन्नाथ असे आरोपीचे नाव असून, तो मोक्का कायद्याअंतर्गत झालेल्या कारवाईत जामीनावर मुक्त होता.

रिक्षाचे २० रुपये भाडे मागितले म्हणून आरोपी खाडे याने रिक्षाचालक भाविक जेठवा यांना बेदम मारहाण करून गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना ५ मे च्या रात्री १२ वाजता पश्चिमेकडील रेल्वे स्टेशन परिसरातील मच्छीमार्केट समोरील रिक्षा स्टॅण्डवर घडली होती. याप्रकरणी खाडे विरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. खाडे हा मोक्कामधील जामीनावर मुक्त असलेला आरोपी असून, त्याच्याविरोधात भिवंडी कोनगाव पोलीस ठाणे येथे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, तो कोपर ब्रीज परिसरात येणार असल्याची खात्रीलायक माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळताच विष्णूनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर. एम. खिल्लारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वडणे यांनी पथकासह सापळा लावून खाडेला अटक केली.

------------------------------------------------------

Web Title: Arrested for attacking autorickshaw driver