शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

म्हाडाची घरे देतो सांगून अनेकांना फसवणाऱ्या ५ जणांना अटक

By धीरज परब | Updated: September 21, 2023 23:29 IST

म्हाडाची हुबेहूब पत्र , शिक्के आदी अनेक मुद्देमाल पोलिसांना सापडला आहे . 

मीरारोड - म्हाडाच्या इमारतीत स्वस्तात फ्लॅट देतो सांगून तशी कागदपत्रे , रबरी शिक्के आदींचा वापर करून अनेकांची फसवणूक करणारी टोळी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा १ ने उघडकीस आणली आहे . म्हाडाची हुबेहूब पत्र , शिक्के आदी अनेक मुद्देमाल पोलिसांना सापडला आहे . 

मीरारोड येथील म्हाडाच्या इमारतीत फ्लॅट देतो सांगून काही जण लोकांची फसवणूक करत असल्याची माहिती गुन्हे शाखा १ ला मिळाली .  गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक निरीक्षक प्रशांत गांगुर्डे व पुष्पराज सुर्वे सह राजु तांबे, सचिन हुले, विजय गायकवाड, समीर यादव, सुधीर खोत, प्रशांत विसपुते, सनी सुर्यवंशी, किरण आसवले यांच्या पथकाने तपास सुरु केला . 

म्हाडाचा अधिकारी म्हणून ओळखपत्र दाखवणारा सुजीत दत्ताराम चव्हाण रा. मीरारोड सह  जावेद अल्लीशा पटेल, रा. गोरेगाव, मुंबई, मोइनउद्दीन सलीमउद्दीन खान, रा.  मीरारोड, अफसर ईशाद शेख रा. मुंब्रा, राजेंद्रप्रसाद राजकारण यादव रा. भाईंदर हे ५ जण भाईंदरच्या राई शिवनेरी येथे शोभा जाधव यांच्या घरी सदनिकेचे पैसे घेण्यास गेले असता पोलीस पथकाने त्या ५ जणांना अटक केली . 

शोभा यांच्या फिर्यादी वरून भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्यांच्या कीर्ती आणि स्वाती या मुलींच्या नावे मीरारोडच्या बालाजी हॉटेल जवळील म्हाडा इमारतीत फ्लॅट देतो म्हणून ८ लाख घेतले होते . तर मुलगा स्वप्नीलच्या नावे फ्लॅट साठी २ लाख घेतले होते व बुधवारी आणखी ४ लाख घेण्यास आले असताना पोलिसांनी पकडले . 

राजेंद्रप्रसाद यादव मार्फत शोभा यांची चव्हाण सोबत ओळख झाली होती . २ बीएचके साठी ५० लाख तर १ बीएचके साठी ४० लाखात फ्लॅट देणार होते . आरोपींनी म्हाडाचे म्हणून हुबेहूब पझेशन लेटर , अलॉटमेंट लेटर , करारनामा , तसेच धनादेश घेतल्याचे स्टॅम्प पेपर लिहून दिले . इतकेच काय तर शोभा यांच्या मुलींच्या सदनिकेची कर्ज बाबत पोस्टाने म्हाडाचे पत्र देखील आले. 

आरोपीं कडे बनावट रबरी शिक्के मोठ्या प्रमाणात सापडले . बायोमेट्रिक द्वारे त्यांनी सदनिका घेणाऱ्यांची नोंदणी देखील केली होती . आणखी अनेकांची ह्या टोळीने फसवणूक केली असून त्यांचे अन्य साथीदार सुद्धा असल्याने त्यांचा शोध सुरु आहे . अटक आरोपी हे पोलीस कोठडीत आहेत .