तरुणीचा विनयभंग करणाऱ्यास अटक, नौपाडा पोलिसांची कारवाई; पोलीस कोठडीत रवानगी
By जितेंद्र कालेकर | Updated: October 16, 2022 21:42 IST2022-10-16T21:41:18+5:302022-10-16T21:42:30+5:30
दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यास अटक, नौपाडा पोलिसांची कारवाई; पोलीस कोठडीत रवानगी
ठाणे:
मासुंदा तलाव परिसरातील पदपथावरुन घरी परतणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या फक्रुद्दीन शेख (४४, विक्रोळी) या आरोपीला अटक केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी रविवारी दिली. त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
पिडित तरुणी १५ आॅक्टोबर रोजी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास मासुंदा तलाव भागातील पदपथावरुन ही मुलगी घरी जात होती. त्यावेळी एका सराफाच्या दुकानात विक्रेता असलेल्या शेख याने तिला अश्लील प्रश्नावली करीत तिचा विनयभंग करुन लैंगिक सतावणूक केली. याप्रकरणी पिडित तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण यांच्या पथकाने आरोपीला अवघ्या काही तासांमध्ये अटक केली.