शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पत्नीचा खून करून नैसर्गिक मृत्यूचा बनाव करणाऱ्या पतीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 4:50 AM

आजारी असलेल्या पत्नीचा संपत्तीच्या वादातून गळा आवळून खून करून तिचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचा बनाव करणा-या पतीला श्रीनगर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अटक केली.

- जितेंद्र कालेकर ठाणे : आजारी असलेल्या पत्नीचा संपत्तीच्या वादातून गळा आवळून खून करून तिचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचा बनाव करणा-या पतीला श्रीनगर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अटक केली. तिच्या मृत्यूबद्दल संशय आल्यानंतर पोलिसांनी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर हा प्रकार उघड झाला.ठाण्यातील रूपादेवीपाडा क्रमांक-२, साई मित्र मंडळ चाळ येथे शुक्ला कुटुंब राहते. आजारपणामुळे शारदा (५५) अंथरुणाला खिळून होती. त्यामुळे पती सोमनाथला (६५) तिची अनेक कामे करावी लागत होती. तो तिचा दुसरा पती असल्यामुळे पहिल्या पतीच्या मुलांना संपत्तीमध्ये वाटा मिळावा, असा तिने त्याच्याकडे हट्ट धरला होता. यातूनच दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरूहोता. याच वादातून त्याने ८ नोव्हेंबर रोजी तिचा गळा आवळला. त्यात गुदमरून तिचा मृत्यू झाला. तिला मिर्गीचाही त्रास असल्यामुळे ती नेहमीच चक्कर येऊन घरात पडत असे. हाच फायदा घेऊन त्याने ती चक्कर येऊन पडल्याचा बनाव केला.तिला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रकरण श्रीनगर पोलीस ठाण्यात गेले. तिच्या गळ्याभोवती असलेला एक व्रण पोलिसांच्या निदर्शनास आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस निरीक्षक दिनकर चंदनकर यांच्या पथकाने याच व्रणामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. तिचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचा प्राथमिक अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ९ नोव्हेंबर रोजी दिला. त्याच आधाराने पोलिसांनी त्याला ‘बोलते’ केल्यानंतर सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा दावा करणाºया तिच्या पतीने अखेर तिचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमनाथने पत्नीची मिर्गीवरील औषधे बंद केली होती. याच कारणाने त्यानेही खुनाचा संशय व्यक्त केला.>मुलाने दाखल केली तक्रारतिचा मुलगा विशाल यादव (३५) यान सावत्र पित्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आई शारदा आणि सावत्र वडील सोमनाथ शुक्ला यांच्या नावावर असलेल्या दोन रूमपैकी आईच्या नावावर असलेली रूम ही विशालचा भाऊ अमोल यादव याच्या नावावर करावी. विशालच्या सावत्र वडीलांच्या यांच्या नावावर असलेली रूम ही सावत्र भाऊ अशोक शुक्ला याच्या नावावर करावी, असा आग्रह शारदा यांनी पतीकडे धरला होता. मात्र, या दोन्ही रूम सोमनाथ हा विशालचा सावत्र भाऊ अशोक शुक्लाच्या नावाने करणार होता.