यूपीएससी परीक्षेत ठाण्याच्या अर्पिता ठुबेचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:43 IST2021-09-26T04:43:35+5:302021-09-26T04:43:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री उशिराने जाहीर झाला. या परीक्षेत ठाण्याच्या अर्पिता ...

यूपीएससी परीक्षेत ठाण्याच्या अर्पिता ठुबेचे यश
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री उशिराने जाहीर झाला. या परीक्षेत ठाण्याच्या अर्पिता ठुबे हिचा देशात ३८३ वा रँक आला आहे. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे पदवी शिक्षण अर्पिताने घेतले, मात्र तिचे वडील पोलीस निरीक्षक असून त्यांचे काम पाहूनच तिने समाजसेवेच्या क्षेत्रात यायचे ठरवले. आणि मग परीक्षेची तयारी केली. दुसऱ्या प्रयत्नात तिने हे यश मिळविले असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ठाण्यातच लहानाची मोठी झालेली अर्पिता हिचे शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षण सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतून पूर्ण झाले आहे. तर इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी तिने सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथून घेतली आहे. तिला इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्येच मास्टर्स करायचे होते. मात्र तिच्या वडिलांच्या कार्यक्षेत्रामुळे प्रभावित होऊन तिने यूपीएससीची परीक्षा दिली. दुसऱ्या प्रयत्नात इतके चांगले यश मिळाल्यामुळे आपण खूश असून, अपेक्षित त्या हुद्द्यावर नोकरी मिळेल, असा तिला विश्वास आहे. तर आपल्या यशाचे सारे श्रेय अर्पिताने तिची आई, वडील आणि गुरू यांना दिले आहे.