सेना नगरसेवक डिसोझांचे नगरसेवकपद अखेर रद्द
By Admin | Updated: February 7, 2016 00:30 IST2016-02-07T00:30:56+5:302016-02-07T00:30:56+5:30
ठाण्यातील शिवसेना नगरसेवक लॉरेन्स डिसोझा यांनी सादर केलेले जातप्रमाणपत्र विभागीय जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने अखेर रद्द करून ते सरकारजमा केल्यानंतर अखेर शनिवारी

सेना नगरसेवक डिसोझांचे नगरसेवकपद अखेर रद्द
ठाणे : ठाण्यातील शिवसेना नगरसेवक लॉरेन्स डिसोझा यांनी सादर केलेले जातप्रमाणपत्र विभागीय जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने अखेर रद्द करून ते सरकारजमा केल्यानंतर अखेर शनिवारी महापालिका आयुक्तांनीदेखील त्यांचे नगरसेवकपद रद्द करून समितीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे शिवसेनेचा आणखी एक नगरसेवक कमी झाला आहे.
माजिवडा प्रभाग १९ अ मधून शिवसेनेच्या तिकिटावर ते निवडून आले होते. त्यांनी माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते देवराम भोईर यांचा पराभव केला होता. जातपडताळणी समिती, दक्षता पथकाचा अहवाल, न्यायालयातील लढाईत ते हरले. त्यानंतर समितीने पालिकेला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शनिवारी त्यांचे पद रद्द करण्यात आले.