शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्यास रिव्हॉल्व्हरसह ठाण्यात अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: September 25, 2018 22:35 IST

उत्तरप्रदेशातून आठ हजारांमध्ये आणलेले रिव्हॉल्व्हर ठाण्यात दहा हजारांमध्ये विक्रीसाठी आणणा-या शितलाप्रसाद मिश्रा याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केली आहे. त्याच्या साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिटची कारवाईउत्तरप्रदेशातून तस्करीटोळीचा शोध सुरु

ठाणे : शस्त्रास्त्रांची तस्करी करणा-या शितलाप्रसाद मिश्रा (२१, रा. एल्फीस्टन रोड, मुंबई) याला ठाण्याच्या मॉडेला चेकनाका भागातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून सहा बोअरचे एक रिव्हॉल्व्हरही हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.वागळे इस्टेट मॉडेला चेकनाका भागात मिश्रा रिव्हॉल्व्हरची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे यांना मिळाली होती. त्या आधारे उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे आणि श्रीनिवास तुंगेनवार यांच्या पथकाने १९ सप्टेंबर रोजी मिश्राची एका रिव्हॉल्व्हरसह धरपकड केली. त्याने आठ हजारांमध्ये उत्तरप्रदेशातून या रिव्हॉल्व्हरची खरेदी केली होती. ठाण्यात त्याची तो दहा हजारांमध्ये विक्रीसाठी गि-हाईकाच्या शोधात असतांनाच ठाणे पोलिसांनी त्याला अटक केली. उत्तरप्रदेश ते मुंबई आणि ठाण्यात शस्त्रांस्त्रांची विक्री करण्यासाठी मिश्रासह आणखी दोन ते तीन जणांची टोळी कार्यरत असून त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने सांगितले. सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक