शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील कंटेनमेंट झोनवर लक्ष ठेवण्यासाठी दोन विशेष पोलीस उपायुक्तांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 00:48 IST

कंटेनमेंट झोनच्या परिसरातील कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी ठाणे आणि वागळे इस्टेट या दोन परिमंडळांसाठी आणखी दोन अतिरिक्त पोलीस उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्यासाठी दीपक देवराज तर वागळे इस्टेटसाठी संजय जाधव यांच्याकडे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी अतिरिक्त पदभार सोपविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी ठेवणार करडी नजरठाण्यासाठी दीपक देवराज तर वागळे इस्टेटसाठी संजय जाधव यांच्याकडे अतिरिक्त पदभार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी ठाणे आणि वागळे इस्टेट या दोन परिमंडळांसाठी आणखी दोन उपायुक्तांची नियुक्ती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सोमवारी केली. ठाण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे दीपक देवराज तर वागळे इस्टेटसाठी आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील वागळे इस्टेट आणि ठाणे शहर या दोन परिमंडळांच्या परिसरातील मुंब्रा, राबोडी, कळवा तसेच वागळे इस्टेट, श्रीनगर आणि कोपरी या भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २५ मे अखेर ठाणे महापालिका क्षेत्रात दोन हजार १७२ जणांना कोरोनाची बाधा झाली. यातील ८३८ कोरानातून मुक्त झाले. तर ६७ जणांचा मृत्यु झाला. कंटेनमेंट झोनमध्ये संचारबंदी कडक असतांना अनेकजण सर्रास त्याचे उल्लंघन करतात. अनावश्यकपणे घराबाहेर पडतात. कंटेनमेंट झोनमध्ये जर संक्रमण वाढले तर त्याचा धोका इतरही भागात होऊ शकतो. त्यामुळेच ठाणे आणि वागळे इस्टेट या दोन परिमंडळांमधील सुमारे २५० कंटेनमेंट झोनवर हे दोन उपायुक्त विशेष लक्ष केंद्रीत करणार आहेत. त्यासाठी खास पोलीस बंदोबस्तही राहणार असून हे उपायुक्त त्या त्या कंटेनमेंटमध्ये अचानक भेटीही देणार आहेत. या भागातील वाहनांवर आणि दुकानांवरही निर्बंध राहणार आहेत. परिमंडळ एकचे सध्याचे उपायुक्त सुभाष बुरसे आणि वागळे इस्टेटचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्याकडे नियमित कायदा सुव्यवस्था, मजूरांच्या स्थलांतराची जबाबदारी तसेच कंटेनमेंट झोनच्या बाहेरील बंदोबस्त आदी कामांची विभागणी करण्यात आली आहे. तर कंटेनमेंटची जबाबदारी असलेले उपायुक्त देवराज यांच्याकडे कळवा, मुंब्रा, राबोडी, डायघर आणि ठाणेनगर या पोलीस ठाण्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर उपायुक्त जाधव यांच्याकडे वागळे इस्टेट, श्रीनगर, कोपरी, वर्तकनगर, कापूरबावडी, चितळसर आणि कासारवडवली या पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत येणाऱ्या कंटेनमेंट झोनची जबाबदारी आहे.उथळसर, माजीवडा, वर्तकनगर,लोकमान्यनगर, वागळे इस्टेट, नौपाडा-कोपरी, कळवा, मुंब्रा आणि दिवा या नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये २३९ कंटेनमेंट झोन आहेत. एकटया मुंब्रा भागात ३० पेक्षा अधिक कंटेनमेंट झोन आहेत. स्थानिक पोलिसावरील वाढता ताण लक्षात घेऊन नुकतीच या भागांमध्ये केंद्रीय शीघ्र कृती दलाचीही नियुक्ती केली आहे. आता अतिरिक्त दोन उपायुक्तांमुळे या कंटेनमेंट झोनवर निगराणी करणे सोपे जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस