शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परमबीर सिंग खंडणी प्रकरणाचा ठाणे पोलिसांच्या एसआयटीची नियुक्ती

By जितेंद्र कालेकर | Updated: August 5, 2021 19:34 IST

बांधकाम व्यावसायिक केतन तन्रा आणि क्रिकेट बुकी सोनू जालान यांनी परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध दाखल केलेल्या खंडणी प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्तांच्या अधिपत्याखाली दहा अधिकाऱ्यांच्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) निर्मिती ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी गुरुवारी केली आहे.

ठळक मुद्दे संपूर्ण प्रकरणाचा करणार तपास२८ आरोपींच्या आरोपांची होणार चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बांधकाम व्यावसायिक केतन तन्रा आणि क्रिकेट बुकी सोनू जालान यांनी परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध दाखल केलेल्या खंडणी प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्तांच्या अधिपत्याखाली दहा अधिकाऱ्यांच्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) निर्मिती ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी गुरुवारी केली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातील आरोपी आणि त्यांच्या आरोपांची या एसआयटीमार्फतीने चौकशी केली जाणार असल्याची माहिती एका वरीष्ठ पोलीस अधिकाºयाने दिली.मुंबई तसेच ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग, गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त दीपक देवराज, एन्काऊंटर स्पेशालिस्ट निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, कथित पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता बिनू वर्गीस यांच्यासह २८ आरोपींविरुद्ध केतन तन्ना आणि सोनू जालान यांनी हा खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल केला आहे. खंडणी, पैसे वसूलीसाठी धमकावणे अशी गंभीर कलमे या गुन्हयांमध्ये आहेत. एरव्ही, एखादा पोलीस निरीक्षक किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाºयाकडून अशा गुन्हयांचा तपास होतो. मात्र, यात अडकलेले पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाºयासह अनेक बडया अधिकाऱ्यांचा तसेच खासगी व्यक्तींचाही समावेश आहे. त्यांच्यावर झालेले आरोपही गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळेच अत्यंत क्लिष्ट, गुंतागुंतीच्या या प्रकरणाचा तपास करण्यासाठीही एक दोन नव्हे तर अधिकारी आणि कर्मचाºयांच्या टीमचीच आवश्यकता असल्याचा अभिप्राय काही वरिष्ठ अधिकाºयांनी पोलीस आयुक्त जयजित सिंह यांच्याकडे नोंदविला होता. याचीच दखल घेत पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या अधिपत्याखाली पाच अधिकारी आणि पाच कर्मचाºयांचा समावेश असलेली एसआयटी तपास करणार आहे. या टीमला गरज पडली तर इतरही पोलीस ठाण्यांच्या अधिकाºयांनी मदत करायची असल्याचे आयुक्तांनी बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी