शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

पल्स पोलिओ मोहिमेसाठी शाळकरी मुलांची नियुक्ती, भार्इंदरची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 7:13 AM

मीरा-भार्इंदर पालिकेच्या एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेने २८ जानेवारीच्या पल्स पोलिओ मोहिमेत शाळकरी मुलांना स्वत:च्या स्वाक्षरीने ओळखपत्रे देऊन हे काम त्यांना सोपवल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिकेच्या एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेने २८ जानेवारीच्या पल्स पोलिओ मोहिमेत शाळकरी मुलांना स्वत:च्या स्वाक्षरीने ओळखपत्रे देऊन हे काम त्यांना सोपवल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.१९९५ पासून दरवर्षी राष्टÑीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाते. यासाठी पालिकेकडून आरोग्य व वैद्यकीय विभागातील डॉक्टर्स, परिचारिका, लिंक वर्कर, बहुद्देशीय कर्मचारी व इतर कर्मचाºयांची नियुक्ती केली जाते. आतापर्यंत पालिकेने राबविलेल्या मोहिमेंतर्गत एकाही बालकाला पोलिओची लागण झाल्याचे आढळून आलेले नाही. या मोहिमेसाठी प्रसंगी बाहेरुन प्रौढ व्यक्तींची नियुक्ती केली जाते.यंदा मात्र पालिकेने २८ जानेवारीला राबविलेल्या पल्स पोलिओ मोहिमेत कार्यालयीन कर्मचाºयांसह शाळकरी मुलांना सामावून घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली. केवळ पल्स पोलिओचे डोस देण्याचे काम त्या मुलांना दिले नाही, तर त्यांना रितसर ओळखपत्रेही दिल्याचे उजेडात आले आहे. ही ओळखपत्रे पालिकेच्या भार्इंदर पश्चिमेकडील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या योगिता वाघमारे या परिचारिकेने स्वत:च्या स्वाक्षरीने दिल्याचे उघड झाले. या कामाची ओळखपत्रे देण्यात आलेली ही मुले याच परिसरातील एका शाळेतील नववी-दहावीतील विद्यार्थी असल्याचे उघड झाले आहे. ही धक्कादायक बाब समोर आल्याने पालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. दहावीपर्यंतच्या मुलांना मोहिमेत सामावून घेण्यात हरकत नसल्याची सारवासारव विभागाकडून करण्यात आली. हा प्रकार बालकामगार कायद्याचे उल्लंघन करणारा असल्याचे विभागाच्या निदर्शनास आणून देताच त्यांची पाचावर धारण बसली. यानंतर त्या परिचारिकेचा शोध घेऊन तिच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरु करण्यात आली. याबाबत पल्स पोलिओ मोहीमेच्या प्रमुख डॉ. अंजली पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा प्रकार गंभीर असून त्याप्रकरणी संबंधित परिचारिकेला कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे सांगितले. त्यांनी खुलासा केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :thaneठाणे