वर्षानंतर सहायक संचालकांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:27 IST2021-07-02T04:27:41+5:302021-07-02T04:27:41+5:30

मीरा रोड : यूएलसी घोटाळ्यात मीरा- भाईंदर महापालिकेचे नगररचनाकार दिलीप घेवारे याला ठाणे गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर तब्बल एक ...

Appointment of Assistant Director after one year | वर्षानंतर सहायक संचालकांची नियुक्ती

वर्षानंतर सहायक संचालकांची नियुक्ती

मीरा रोड : यूएलसी घोटाळ्यात मीरा- भाईंदर महापालिकेचे नगररचनाकार दिलीप घेवारे याला ठाणे गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर तब्बल एक वर्षाने नगरविकास विभागाने महापालिकेच्या सहायक संचालकपदी अधिकारी नियुक्त केला आहे. नगररचनाकाराबरोबरच सहायक संचालकपदही घेवारे याच्याचकडे होते.

यूएलसी घोटाळ्यात पसार झालेल्या घेवारेला २५ जून रोजी अटक झाल्याचे पोलिसांनी पालिकेस कळवल्यानंतर आयुक्त दिलीप ढोले यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवले. आयुक्तांनी सहायक संचालक व नगररचनाकार पद भरण्याची विनंती केली. घेवारेला ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे त्याचे निलंबन अटळ मानले जाते.

गुरुवारी सहायक संचालकपदी हेमंत ठाकूर यांची नियुक्ती केली आहे. ठाकूर हे सध्या नवी मुंबई महापालिकेत सहायक संचालकपदी असून मीरा भाईंदरचा प्रभारी भार त्यांच्याकडे सोपवला आहे. या आधी ठाकूर हे काही काळ मीरा- भाईंदर महापालिकेत नगररचनाकारपदी कार्यरत होते.

Web Title: Appointment of Assistant Director after one year