शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

समाधानकारक पाऊस नसल्याने चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 01:11 IST

धरणांतील पाणीसाठा होतोय कमी : मंगळवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी; ठाणे शहरात सखल भागांत साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जुलै संपत आला तरी ठाणे जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. मुंबईसह ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने धरणांतील पाणीसाठा कमी होऊ लागला असून जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. हवामान खात्याच्या इशाºयानंतर मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. यामुळे ठाणे शहरांत घोडबंदर रोडसह सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. यामुळे वाहनचालकांचे हाल झाले.ठाणे शहर व तालुक्यात गेल्या २४ तासांत २८ मिमी. पाऊस पडला. या दरम्यान एक झाड पडण्याच्या घटनेसह एक झाड धोकादायक स्थितीत आहे. तर एका ठिकाणी पाण्याची पाइपलाइन लिकेज झाल्याची घटना घडली. तर अन्य आठ किरकोळ घटना घडल्या. जिल्ह्यात ९६.५० मिमी. पाऊस गेल्या २४ तासांत पडला. ठाणेनंतर भिवंडीत सर्वाधिक २२ मिमी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात सरासरी १३.७९ मिमी. पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. यात ठाणे शहरात रात्री पाचपाखाडीत सोसायटीवर झाड पडले. यामुळे येथील रस्ता काही काळ बंद करावा लागला होता. यात झाडामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र, घरांचे व दोन दुकानांचे नुकसान झाले. या झाडांमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी नौपाडा पोलिसांसह ठाणे मनपाच्या आपत्ती नियंत्रण व व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, कर्मचारी, तर अग्निशमन दलाचे अधिकारी उपस्थित झाले आहेत. या झाडांमुळे हा रस्ता काही काळ बंद होता. या दरम्यान पावसाची रिपरिप सुरू झाल्याने झाड हटवण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता.या दरम्यान शहरात मानपाडा पोलीस स्टेशनच्या परिसरात पावसाचे पाणी साचल्याची घटना घडली. तर, वसंत विहारजवळील आनंद दिघे जिद्द शाळेजवळील एक झाड पडले. वर्तकनगरला झाडाच्या फांद्या पडल्या. याप्रमाणेच जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या शहरी भागासह ग्रामीण भागातही पावसाचे आगमन झाले.धरणांना पावसाची प्रतीक्षाच्ठाणे जिल्ह्यातील धरणांना अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये दुप्पट पाऊस आजपर्यंत कमी पडला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा वाढण्याची चिंता लागून आहे.च्आॅगस्ट आणि सप्टेंबर या उरलेल्या दोन महिन्यांत पुरेसा पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बसण्याची भीती व्यक्त होत आहे.