अनुरागजी आमची केडीए्मसी फक्त सेटिंगमध्ये स्मार्ट; आमदार राजू पाटील यांनी काढला चिमटा
By मुरलीधर भवार | Updated: September 12, 2022 21:16 IST2022-09-12T21:16:11+5:302022-09-12T21:16:18+5:30
अनुराग ठाकूर यांनी खराब रस्त्याविषयी केडीएमसी आयुक्तांना खडे बोल सुनावल्यानंतर आमदार पाटील यांनी हा चिमटा काढला आहे.

अनुरागजी आमची केडीए्मसी फक्त सेटिंगमध्ये स्मार्ट; आमदार राजू पाटील यांनी काढला चिमटा
कल्याण-अनुराग ठाकूरजी आमची केडीएमसी फक्त सेटिंगमध्ये स्मार्ट आहे. मग ती टक्केवारीची असो की नवनवीन पुरस्कार असो, बरे झाले आपणच घरचा आहेर दिला आहे अशी टिका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. अनुराग ठाकूर यांनी खराब रस्त्याविषयी केडीएमसी आयुक्तांना खडे बोल सुनावल्यानंतर आमदार पाटील यांनी हा चिमटा काढला आहे.
आमदार पाटील हे वारंवार महापालिका प्रशासन आणि सत्ताधा:यावर टिका करतात. रखडलेले प्रकल्प असो की, रस्त्यावरील खड्डे असो. त्यावर पाटील सातत्याने केडीएमसी प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करतात. काही दिवसापूर्वी रखडलेल्या प्रकल्पा संदर्भात कल्याण शीळ रस्त्यावर बॅनरबाजी केली होती. हा बॅनर चर्चेचा विषय ठरला होता. आत्ता तर अनुराग ठाकूर यांनी जे आयुक्तांना खडे बोल सुनावले आहे. त्यानंतर आमदार पाटील यांनी महापालिका प्रशासनाला चिमटा काढला आहे. याविषयीचे ट्वीटच पाटील यांनी केले आहे.