आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

By Admin | Updated: May 11, 2016 02:05 IST2016-05-11T02:05:46+5:302016-05-11T02:05:46+5:30

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोखाडा शाखेत सोनाराला हाताशी धरुन दोन कोटी ७२ लाखांच्या सोने तारण कर्जाचा घोटाळा करणाऱ्या भास्कर मोरे या बडतर्फ शाखा व्यवस्थापकाचा अटकपूर्व जामीन

The anticipatory bail application was rejected by the accused | आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

ठाणे: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोखाडा शाखेत सोनाराला हाताशी धरुन दोन कोटी ७२ लाखांच्या सोने तारण कर्जाचा घोटाळा करणाऱ्या भास्कर मोरे या बडतर्फ शाखा व्यवस्थापकाचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. कदम यांनी फेटाळला.
उर्वरित आरोपींच्या हंगामी जामीन अर्जालाही न्यायालयाने हरकत घेतली आहे. आधी घोटाळयातील पैसे भरा, मगच हंगमी जामिनासाठी अर्ज करा, असेही न्यायालयाने त्यांना बजावले. याच प्रकरणातील हिशेबनीस गावीतच्या अर्जावर १२ मे रोजी सुनावणी होणार आहे.
टीडीसीच्या मोखाडा शाखेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक मोरे, हिशेबनीस गावीत यांनी काही कर्जदारांशी संगनमत करुन ९६ लाख ९२ हजारांचे कर्ज बनावट सोने गहाण ठेवून वाटल्याचे उघड झाले. तसेच एक कोटी ७२ लाखांची १४ कर्जप्रकरणे अद्यापही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. या प्रकरणात विजय दापत या कर्जदाराला ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. त्याने मार्च २०१५ मध्ये बनावट सोने गहाण ठेवून ८६ हजारांचे कर्ज घेतले होते.
शिक्षक संघाचे अध्यक्ष गणपत पाटील हेही संशयित आरोपी असून त्यांना यापूर्वी ७ मे रोजी हंगामी जामीन मंजूर करण्यात आला आहे. मोरेसह बँकेच्या चार तत्कालीन अधिकाऱ्यांनी संगनमत करुन १७ कर्जदारांच्या संगनमताने दोन कोटी ७२ लाखांचे कर्ज अशाच प्रकारे काढले होते. वारंवार नोटिसा बजावूनही कर्जदार कर्ज फेडत नसल्यामुळे २८ एप्रिलला या सोन्याच्या लिलावाची प्रक्रिया सुरु झाली. तेव्हा या बनावट सोने प्रकरणाचा भांडाफोड झाला. त्याचदरम्यान बँकेच्या खातेनिहाय चौकशीतही मोरे आणि गावित यांनी संगनमताने बोगस प्रकरणे मंजूर करुन सोने घोटाळा केल्याचे उघड झाले. त्यामुळे बँकेनेही त्यांना बडतर्फ केले. (प्रतिनिधी)

Web Title: The anticipatory bail application was rejected by the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.