विरोधी आमदारांनीही करावी बिलवसुली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:52 IST2017-11-10T00:52:53+5:302017-11-10T00:52:56+5:30
मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ च्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी सरकारने विरोधी पक्षाच्या आमदारांनाही पत्र पाठवून कृषीपंपधारक वीजग्राहकांच्या वीजबिलांच्या वसुलीसाठी मतदारसंघात ग्राहक

विरोधी आमदारांनीही करावी बिलवसुली!
आसनगाव/शहापूर : मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ च्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी सरकारने विरोधी पक्षाच्या आमदारांनाही पत्र पाठवून कृषीपंपधारक वीजग्राहकांच्या वीजबिलांच्या वसुलीसाठी मतदारसंघात ग्राहक मेळावे आणि शिबिरे घेण्यास सांगितले आहे. सरकारचा हा अजब फतवा असून आमदारांना एवढेच काम बाकी होते का, असा सवाल शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी केला आहे. याबाबत नाराजी व्यक्त करून शेतकºयांचे वीजकनेक्शन खंडित केल्यास जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच कर्जमाफी आणि वीजबिल तत्काळ माफ करण्याची मागणीही केली आहे.
शहापूर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आ. पांडुरंग बरोरा यांना पत्र पाठवून कृषीपंपधारक वीजग्राहकांच्या म्हणजेच शेतकºयांकडून वीजबिल भरणा करण्यासंदर्भात आपल्या मतदारसंघात मेळावे तसेच शिबिरे घेऊन महावितरणला सहकार्य करण्याबाबत पत्र पाठवले आहे. तर, कृषीपंपधारक थकबाकीदार शेतकºयांचे वीजबिल भरण्यासाठी १५ दिवसांची म्हणजेच १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे सरकारने जाहीर केले आहे. तर, १५ नोव्हें. पर्यंत शेतकºयांचे वीजकनेक्शन खंडित केले जाणार नाही. तसेच मुद्दल रकमेचे पाच हप्ते केले असून हे पाच हप्ते डिसेंबर २०१७ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत शेतकºयांनी भरावयाचे आहेत, असे या पत्रात म्हटले आहे.
या पत्रामुळे आ. बरोरा नाराज असून शेतकºयांना कर्जमाफी न दिल्याने तसेच परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शेतकºयांना कर्जमाफी व वीजबिल माफ करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.