शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

बुलेट ट्रेन मार्गावरील २८ पुलांच्या बांधकामासाठी आणखी एक पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 21:37 IST

नॅशनल हायस्पीड रेल कॉपोर्रेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) यांनी शुक्रवारी तांत्रिक निविदा खुल्या केल्या. 

नारायण जाधवठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गादरम्यान येणारे महामार्ग, रेल्वेमार्ग आणि नद्या यांवर २८ पुलांची उभारणी करण्याबरोबरच बडोदा आणि अहमदाबाद यादरम्यान सुमारे ८८ किमी मार्गावर व्हायाडक्ट्ससह आणंद/नडियाद या उन्नत स्थानकांचे बांधकाम करणे व पाच पूल आणि २५ क्रॉसिंग्ज यांची उभारणी करणे, यासाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉपोर्रेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) यांनी शुक्रवारी तांत्रिक निविदा खुल्या केल्या. या निविदा प्रक्रियेत टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड, अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, ब्रेथवेट अ‍ॅण्ड कंपनी लिमिटेड कन्सोर्शियम, ब्रिज अ‍ॅण्ड रूफ कं. (इंडिया) लिमिटेड, एनसीसी लिमिटेड, जेएमसी प्रोजेक्ट्स (इंडिया) लिमिटेड अ‍ॅण्ड राही इन्फ्राटेक लिमिटेड, आयएसजीईसी हेवी इंजिनीअरिंग लिमिडेट- एम अ‍ॅण्ड बी इंजिनीअरिंग लिमिटेड कन्सोर्शियम, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो-आयएचआय इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टीम्स कन्सोर्शियम यांचा समावेश आहे. तर, ८८ किमी मार्गावर व्हायाडक्ट्स आणि आणंद/नडियाद या स्थानकांच्या निर्मितीसाठी अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड-इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड - जेएमसी प्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेड कन्सोर्शियम, एनसीसी लिमिटेड- टाटा प्रोजेक्ट लिमिटेड - जे. कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड-एचएसआर कन्सोर्शियम, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो लिमिटेड यांनी रस दाखविला आहे. २८ पुलांच्या उभारणीसाठी सुमारे ७० हजार मेट्रिक टन पोलादाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे अर्थातच पोलादनिर्मिती क्षेत्राला मोठी मागणी या प्रकल्पामुळे निर्माण होणार आहे.या निविदांमुळे बुलेट ट्रेन मार्गाच्या एकूण ५०८ किमी लांबीपैकी ३२५ किमी लांबीचा मार्ग (६४ टक्के), १२ स्थानकांपैकी वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच आणि आणंद/नडियाद या पाच स्थानकांची उभारणी आणि सुरत येथे उभारला जाणारा ट्रेन डेपो यांसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याच आठवड्यात २३७ लांबीचा मार्ग आणि चार स्थानके यांच्या उभारणीसाठीही एनएचएसआरसीएलने निविदा काढल्या होत्या. त्यात तीन निविदाकर्त्यांनी सहभाग घेतला, ज्यात सात मोठ्या बांधकाम कंपन्यांचा समावेश आहे. या निविदांमुळे भारतातील पोलाद आणि सिमेंटनिर्मिती उद्योगांना तसेच त्यांच्या पुरवठादारांना बळकटी मिळणार आहे.