भिवंडीतून पीएफआयचा आणखी एका पदाधिकारी ताब्यात 

By नितीन पंडित | Published: September 27, 2022 03:46 PM2022-09-27T15:46:25+5:302022-09-27T15:47:26+5:30

दहशतवाद्‍यांना आर्थिक रसद पुरविणारी वादग्रस्त संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) संबंधित ठिकाणांवर राष्‍ट्रीय सुरक्षा संस्‍थेने (एनआयए) सोमवारी पुन्‍हा छापे टाकले.

Another official of PFI detained from Bhiwandi | भिवंडीतून पीएफआयचा आणखी एका पदाधिकारी ताब्यात 

सांकेतिक छायाचित्र

Next

भिवंडी - देशविघातक व दहशतवादी कृत्यांना अर्थ सहाय्य केल्याचा आरोप असलेल्या पीएफआयच्या दुसऱ्या एका पदाधिकाऱ्याला सोमवारी रात्री भिवंडी येथून ठाणे एटीएससह विविध गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. आशिक शेख (रा. आमपाडा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या पीएफआय पदाधिकाऱ्याचे नाव आहे.

दहशतवाद्‍यांना आर्थिक रसद पुरविणारी वादग्रस्त संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) संबंधित ठिकाणांवर राष्‍ट्रीय सुरक्षा संस्‍थेने (एनआयए) सोमवारी पुन्‍हा छापे टाकले. दिल्‍ली, उत्तर प्रदेशसह आठ राज्‍यांमध्‍ये ही कारवाई करण्‍यात आली. ‘पीएफआय’चे १००हून अधिक सदस्‍यांना अटक करण्‍यात आली असून या कारवाईत भिवंडी येथील एका पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे. 

सोमवारी रात्री आशिक शेख याला अटक करण्यात आली. आता पर्यंत भिवंडीतून दोघांना अटक करण्यात आली आहे. याआधी २२ सप्टेंबर रोजी बंगालपूरा परिसरातून मोईनुद्दीन मोमीन याला अटक करण्यात आली आहे.

पीएफआय या संघटनेची मुस्लिम बहुल असलेल्या भिवंडी शहरात पाळेमुळे खोलवर रुजली असून अनेक कार्यकर्ते भूमिगत अथवा स्लीपिंग सेलच्या माध्यमातून कार्यरत आहेत. शहरात व्यवसायाने बिस्कीट चॉकलेटचा घाऊक व्यापार करणाऱ्या संघटनेच्या मोईनुद्दीन मोमीन रा.बंगालपुरा यास ताब्यात घेतल्या नंतर सर्वच यंत्रणांना खडबडून जाग आली.त्यानंतर सोमवारी मध्यरात्री नंतर उशिरा ठाणे एटीएस पथकाने आम पाडा येथील सुपर बेकरी जवळ राहणाऱ्या आशिक शेख यास ताब्यात घेतले आहे.भिवंडी शहरातून आता पर्यंत पीएफआय च्या दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. तर एटीएसच्या पुढील तपासात ही यादी अजून वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 

 

Web Title: Another official of PFI detained from Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.