मोबाइल चोरी प्रकरणात ग्लोबलच्या आणखी एका पेशंट केअरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:52 IST2021-06-16T04:52:25+5:302021-06-16T04:52:25+5:30

ठाणे : मोबाइल चोरी प्रकरणात ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयातील राहुल वल्हाद्रा (२५) या आणखी एका पेशंट केअर टेकरला (पीसी) ...

Another Global Patient Care arrested for mobile theft | मोबाइल चोरी प्रकरणात ग्लोबलच्या आणखी एका पेशंट केअरला अटक

मोबाइल चोरी प्रकरणात ग्लोबलच्या आणखी एका पेशंट केअरला अटक

ठाणे : मोबाइल चोरी प्रकरणात ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयातील राहुल वल्हाद्रा (२५) या आणखी एका पेशंट केअर टेकरला (पीसी) कापूरबावडी पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याच्याकडून एक मोबाइलही हस्तगत केला आहे. यापूर्वीही दीपक सावंत या पीसीला अशाच एका गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे.

भिवंडीतील कशेळी भागात राहणारे सागर धाकडे (३०) यांचे मेहुणे ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात कोविडवरील उपचारासाठी दाखल होते. त्यांच्यावर १७ एप्रिल ते १९ एप्रिल, २०२१ या काळात या रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळाला, त्यावेळी त्यांचा दहा हजारांचा मोबाइल गहाळ झालेला होता. बराच शोध घेऊनही मोबाइल न मिळाल्याने अखेर सागर धाकडे यांनी मोबाइलच्या चोरीची तक्रार १३ जून रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड, उपनिरीक्षक संजय पाटील आणि हवालदार शरद खोडे आदींच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी एक पीसी राहुल यालाही अटक केली. त्याला १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याच्याकडून आणखीही मोबाइल मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Another Global Patient Care arrested for mobile theft