शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

डोंबिवलीच्या उंबरठ्यावर आणखी एक शहर; नगरविकासची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:39 IST

काही अटी, शर्तींवर नगरविकास विभागाने या एकात्मिक नगर वसाहतीस परवानगी दिली आहे.

नारायण जाधव ठाणे : वाहतूककोंडीसह पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या डोंबिवलीच्या उंबरठ्यावर आणखी एका टाउनशिपला शासनाने १२ जुलै २०१९ रोजी मंजुरी दिली आहे. कल्याण-शीळफाटा मार्गावर हे नवे शहर सुमारे १३३ एकरावर उभे राहणार आहे. याच भागात सध्या पलावा सिटी उभारण्यात आली असून याच सिटीच्या पुढे ही नवी सिटी घारीवली, उसरघर, सागांव येथील जमिनीवर उभी राहणार आहे. निवासी इमारती, वाणिज्यिक संकुले असलेली ही एकात्मिक नगर वसाहत असेल. या नव्या शहरात वास्तव्याला येणाऱ्यांच्या नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी सरकारने बिल्डरवर सोपवली आहे.

काही अटी, शर्तींवर नगरविकास विभागाने या एकात्मिक नगर वसाहतीस परवानगी दिली आहे. कल्याण-अंबरनाथ तालुक्यातील २७ गावांच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखड्यातील तरतुदीनुसार ही परवानगी देण्यात आली आहे. कल्याण-शीळ या मार्गावरच ही वसाहत उभी राहणार आहे.

सध्या या मार्गावर अनेक छोट्यामोठ्या वसाहतींसह लोढा समूहाची पलावा सिटी उभी आहे. डोंबिवलीचे विस्तारीत क्षेत्र याच मार्गावर आहे. शिवाय नवी मुंबई-ठाणे-पनवेल या महापालिकांना संपर्क साधणारा कल्याण-शीळफाटा हा रस्ता जुन्या मुंबई -पुणे महामार्गाद्वारे सांधणारा एकमेव दुवा आहे. या मार्गांवरून सध्या जेएनपीटीसह तळोजा आणि नवी मुंबईची टीटीसी औद्योगिक वसाहतीतून दररोज बाहेर पडणाºया कंटेनर, अवजडवाहनांसह कामगारांची ने-आण करणाºया बस, टॅक्सी, कारसह केडीएमटी, एनएमएमटीच्या बस याच मार्गावर धावतात. परिणामी या परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होती. त्यामुळे या मार्गाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातच आता मोठ्या समूहाची टाऊनशिप उभी राहणार असल्याने येथील जागांचे भाव वाढणार आहेत.

समस्यांत पडणार भरशीळफाटा परिसरात सध्या वेगाने लोकसंख्या वाढत असून या परिसरात वाहतूककोंडी, पिण्याच्या पाण्याची टंचाई, प्रदूषण यासह शैक्षणिक सुविधांची वानवा यासारख्या अनेक समस्या आहेत. त्यात नव्या वसाहतींमुळे भर पडणार आहे. सध्या शीळफाटा येथे पिक अवरला लोकांना दीड ते दोन तास कोंडीत अडकावे लागते. नवी टाऊनशीप उभी राहिल्यावर या भागात किती वाहतूककोंडी होईल, याची कल्पनाच न केलेली बरी, अशी चर्चा आहे.

या अटींंवर दिली परवानगीनव्या एकात्मिक वसाहतीस परवानगी देतांना शासनाने अनेक अटी घातल्या आहेत. यात संबधित बिल्डरने केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याच्या परवानग्या स्वत:च घ्यायच्या आहेत. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून जागेची मोजणी करायची आहे. परिसरातील इतर भूखंडधारकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. त्यांच्यासाठी ९ ते १८ मीटर रुंदीचा रस्ता तयार करायचा आहे. रेन वॉटर हार्व्हेस्टिंग, सौर उर्जा प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, त्याचा पुनर्वापर करणे यासह वसाहतीत राहायला येणाºया रहिवासी, वाणिज्यिक संकुलांसाठी पाणी आणि विजेची सोय स्वखर्चाने करायची आहे.