विद्रुपीकरण रोखण्यासाठी जाहिरात धोरण जाहीर
By Admin | Updated: October 3, 2015 23:48 IST2015-10-03T23:48:56+5:302015-10-03T23:48:56+5:30
शहराचे होणारे विद्रुपीकरण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने जाहिरात फलक धोरण जाहीर केले आहे. यामुळे यापुढे परवानगीशिवाय जाहिरात बॅनर्स, होर्डिंग्ज, कापडी फलक

विद्रुपीकरण रोखण्यासाठी जाहिरात धोरण जाहीर
ठाणे : शहराचे होणारे विद्रुपीकरण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने जाहिरात फलक धोरण जाहीर केले आहे. यामुळे यापुढे परवानगीशिवाय जाहिरात बॅनर्स, होर्डिंग्ज, कापडी फलक लावणाऱ्यांवर आर्थिक दंडासह कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद त्यात केली असून याबाबतचे निर्देश शनिवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच विजेचे खांब, हायमास्ट, फूटपाथ, चौक, रस्ता दुभाजक, वाहतूक बेटे, दूरध्वनी पोल, विद्युत डीपी, ट्रान्सफॉर्मर आदी ठिकाणी नव्या धोरणानुसार जाहिरातींसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे.
महापालिका क्षेत्रात शहरातील नागरिक, खाजगी संस्था, राजकीय पक्ष व इतर विविध प्रकारे शहरातील सार्वजनिक जागी जाहिरातबाजी करतात.
याचदरम्यान, उच्च न्यायालय आणि राज्य शासनाकडून जाहिरात फलक लावण्याबाबत धोरण निश्चित करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पालिकांनी शहरातील विद्रुपीकरणास आळा घालण्याबरोबर फलक, बॅनर्स, पोस्टर्स यांच्या नियंत्रणाबाबतची कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना निश्चित केल्या आहेत.
सार्वजनिक ठिकाणी परवानगी देताना संबंधित जागामालकाचे नाहरकत प्रमाणपत्र तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालयाची जागा असल्यास संबंधित शासकीय कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.
विनापरवानगी लावलेले फलक, बॅनर्स, पोस्टर्स व मुदत संपलेले फलक, बॅनर्स, पोस्टर्स काढून टाकण्याची कारवाई प्रभाग समितीस्तरावर करण्यात येणार असून त्या प्रकरणातील संबंधित व्यक्तींविरु द्ध तीन वेळा अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला तर त्या व्यक्तीविरु द्ध सीआरपीसी कलम ११० अंतर्गत चांगल्या वर्तणुकीसाठी हमीपत्र घेण्यासाठी संबंधित सहायक पोलीस आयुक्तांना कळविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
विनापरवानगी जाहिरात लावणाऱ्यांविरु द्ध प्रतिचौरस फूट प्रतिदिन २०० रु पये दंड आकारून प्रशासकीय आकार आणि अनामत रक्कमही दुप्पट आकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याविरु द्ध महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार शहराचे विद्रुपीकरण केल्याबद्दल पोलिसात गुन्हे दाखल होणार आहेत.