नव्या सदस्यांची आज होणार घोषणा
By Admin | Updated: December 26, 2016 07:21 IST2016-12-26T07:21:59+5:302016-12-26T07:21:59+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या ११ सदस्यांचा एक वर्षाचा कालावधी २९ डिसेंबरला संपुष्टात येत आहे.

नव्या सदस्यांची आज होणार घोषणा
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या ११ सदस्यांचा एक वर्षाचा कालावधी २९ डिसेंबरला संपुष्टात येत आहे. मात्र, तत्पूर्वी नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने सोमवारी विशेष महासभा बोलावली आहे. या सदस्यांच्या नियुक्तीबरोबरच स्थायी समितीच्या रिक्त पदावरही भाजपाच्या एका सदस्याच्या नियुक्तीचीदेखील घोषणा होणार आहे.
महिला-बालकल्याण समितीच्या ११ सदस्यांमध्ये शिवसेनेचे ५, भाजपाचे ४, तर काँग्रेस आणि मनसेचा प्रत्येकी १ सदस्य आहे. यात सोनी अहिरे, नमिता पाटील, सुशीला माळी, प्रमिला पाटील, मनीषा तारे (सर्व शिवसेना आघाडी गट), सुमन निकम, उपेक्षा भोईर, सायली विचारे, वैशाली पाटील (सर्व भाजपा व कल्याण-डोंबिवली विकास आघाडी), तर मनसेच्या तृप्ती भोईर आणि काँग्रेसच्या हर्षदा भोईर आहेत. त्यांचा कालावधी २९ डिसेंबरला संपत असल्याने नवीन सदस्यांची नेमणूक करण्यासाठी सोमवारी दुपारी अडीच वाजता विशेष महासभा होणार आहे. प्रमाणशीर प्रतिनिधित्वानुसार या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. प्रत्येक पक्षांचे जितके सदस्य समितीवर आहेत, तेवढेच नवीन सदस्य पुन्हा नियुक्त केले जाणार आहेत. दरम्यान, निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा कालावधी २९ डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे. (प्रतिनिधी)