वर्तकनगर विभागाच्या सहायक आयुक्तपदी अनिल देशमुख; ठाण्यातील अधिकाऱ्यांचा खांदेपालट
By जितेंद्र कालेकर | Updated: March 13, 2023 21:28 IST2023-03-13T21:28:47+5:302023-03-13T21:28:59+5:30
मानवी संसाधन विभागाचे सहायक आयुक्त देशमुख यांची वर्तकनगर विभागात बदली झाली आहे.

वर्तकनगर विभागाच्या सहायक आयुक्तपदी अनिल देशमुख; ठाण्यातील अधिकाऱ्यांचा खांदेपालट
ठाणे: ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील मानवी संसाधन विभागाचे सहायक पोलिस आयुक्त अनिल देशमुख यांच्यासह तीन अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सह. पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी अलीकडेच काढले आहेत. या सर्व बदल्या प्रशासकीय कारणास्तव केल्याचे त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
मानवी संसाधन विभागाचे सहायक आयुक्त देशमुख यांची वर्तकनगर विभागात बदली झाली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे राजकुमार डोंगरे यांना मानवी संसाधन विभागात आणले आहे. तर वर्तकनगर विभागाचे सहायक आयुक्त नीलेश सोनवणे यांना डोंगरे यांच्या जागी गुन्हे शाखेत संधी देण्यात आली आहे.