शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

अंगणवाडी : आजचे आव्हान आणि भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 00:34 IST

आज पूर्वप्राथमिक शिक्षणाची सरकारी सुविधा म्हणून ‘एकात्मिक बालविकास प्रकल्प’ या शासनाच्या महत्त्वाच्या विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या ‘अंगणवाडी’ या केंद्राकडून निश्चितच खूप अपेक्षा आहेत. याच विषयाला अनुसरून प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबईच्या माध्यमातून २५ जून रोजी एक राज्यस्तरीय बालशिक्षण परिषद पनवेल येथे होणार आहे. त्यादृष्टीने ‘अंगणवाडी’ या बालशिक्षण केंद्राच्या अनुषंगाने मांडलेली भविष्यवेधी भूमिका.

- संतोष सोनावणेअंगणवाडी ही शासनाची सरकारी पातळीवरील एकमेव पूर्वप्राथमिक व्यवस्था आहे. मात्र, आज ‘अंगणवाडी’ या बालविकास केंद्राचा बारकाईने विचार केल्यास आपल्याही लक्षात येईल की, येथे येणारी बालके ही अधिक प्रमाणात समाजातील खालच्या स्तरातून येतात. कमी उत्पन्न गटात मोडणाºया कुटुंबांतील मुलांची संख्या इथे जास्त दिसून येते. यामागे अनेक कारणे असू शकतील. पण, त्यापेक्षा या अंगणवाडीत येणाºया मुलांचा विचार करणे गरजेचे आहे.आज आपल्या देशात साधारणपणे १४ लाख अंगणवाडी केंद्रे असून त्यामध्ये सुमारे चार कोटींपेक्षाही जास्त बालके आहेत. तर, महाराष्ट्रात सुमारे लाखभर अंगणवाडी केंद्रे असून त्यात जवळजवळ अर्धा कोटी बालकांचा प्रवेश झालेला आहे. आज प्रत्यक्ष अंगणवाडीत दाखल झालेली बालके ही इतर मुलांच्या शिकण्याच्या तुलनेत मागे राहायला नको असतील, तर अंगणवाड्यांमधील औपचारिक शिक्षणाचं अंग अधिक बळकट व्हावं लागेल. त्यासाठी नेमकं काय करावं लागेल, हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच वास्तव समजून घेणंही महत्त्वाचं आहे.मुलांच्या न शिकण्यामागची ‘गरिबी’ आणि ‘दारिद्रय’ ही महत्त्वाची कारणे आहेत. ही मुले कितीही केले तरी शिकतील असे वाटत नाही, कारण त्यांच्या घरी शैक्षणिक वातावरण नाही. आईवडील लक्ष देत नाहीत आणि मुख्य म्हणजे, या मुलांना शिकायचे नाही, अशी अनेक कारणे ऐकलेली आहेत. खरंच, गरिबी आणि दारिद्रय यांचा मुलांच्या शिकण्यावर इतका परिणाम होतो का? तर तो प्रभाव पूर्वप्राथमिक म्हणजेच तीन ते सहा वयोगटांतील अंगणवाडी केंद्रांत दाखल झालेल्या मुलांवर होतो.गरिबी आणि शिकणं :एखाद्या मुलाचा जन्म हा जर गरीब कुटुंबात झाला, तर यात त्या मुलाचा दोष काय? त्यामुळेच त्याची शाळेतील प्रगती कमी असते, शिकण्याची गती कमी असते. ती वर्गात मागे राहतात, या सर्वांचे खापर मुलांच्या माथी टाकता येणे शक्य नाही. कारण, गरिबीतील अवहेलना, दु:ख, वेदना, कुपोषण, घरचं व आजूबाजूच्या परिसरातलं वातावरण, या अशा मुलांकडे पाहण्याची दृष्टी व त्यातून मिळणारं दुय्यमतेचं दुर्भाग्य... या साऱ्यांचा या मुलांच्या मेंदूवर लहान वयातच निश्चितच विपरित परिणाम होतो. शिकण्याच्या क्षमतेत अडचण येत असते आणि मेंदू हाच माणसाचा शिकण्याचा अवयव असतो.मूल नेमकं शिकतं कसं, याविषयीच्या आजवरच्या अनेक संशोधनांतून मेंदूआधारित शिकणं आणि त्याचे विविध पैलू यांचा उलगडा हा संशोधकांना होत गेला आहे. प्रत्यक्ष मुलाच्या शिकण्याच्या प्रक्रि येत येणाºया अडथळ्यांचा शोध हा मेंदूमध्ये शिरून घेण्यास सुरुवात झाली. साधारणपणे सन २००० नंतर अशा प्रकारच्या अभ्यासांना वेग आला आणि मग मुलांची परिस्थिती, मुलांच्या मेंदूतील बदल आणि शालेयस्तरावरील अभ्यासातील कामगिरी, असा तिहेरी संबंध लक्षात येऊ लागला.मेंदूवर होणारे लहान वयातील परिणाम :गरिबीचे बालवयात होणारे परिणाम हे दीर्घकाल टिकतात. मेंदूचा विकास आणि त्याची जडणघडण ही याच वयात होत असते. त्यामुळे गरिबीत सोसलेले दु:ख, ताणतणाव, व्यथांचे विपरित परिणाम मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर आणि शिकण्याच्या प्रक्रियेवर होत असतात. गरिबीतच जीवन जगणाºया मुलांसंदर्भात तर, त्या गरिबीतून मुक्त होण्यासाठी वरदान ठरणारे ‘शिक्षण’ आणि त्यासाठी निर्माण होणारी इच्छा किंवा क्षमता मारली जाते, हे खरंच आहे. गरीब कुटुंबातील मुलांची शिक्षणातील कामगिरी ही इतर आर्थिकदृष्ट्या चांगल्या परिस्थितीतील मुलांच्या तुलनेत २५ टक्क्यांपर्यंत कमी असू शकते.घरातील सदस्यांचे वर्तन आणि त्यामुळे निर्माण होणारा ताणतणाव मुलांच्या मेंदूवर अनिष्ट परिणाम घडवून आणतो. तसेच काहीवेळा जातीय, धर्मीय, वंशीय विद्वेषाचे वातावरण आणि दारिद्रयावर भाष्य करणाºया प्रतिक्रियांना मुलांना सामोरे जावे लागते. अशी अपराधी व पराभवाची भावना त्यांच्या मनाचे खच्चीकरण करते. याचे दुष्परिणाम मेंदू विकासात होत असतात. मेंदूत सतत नवनवीन चेतापेशींची निर्मिती होत असते, मात्र सततच्या या अशा तणावग्रस्ततेने त्यांचे नवनिर्माणाचे कार्य तिथेच थांबते. मेंदूमध्ये होणारे हे नवनिर्मितीचे विकसन हेच तर खरे शिकणे आहे. त्यातून लक्षात ठेवणे, शिकलेल्या गोष्टी पुन्हा आठवणे या गोष्टींना हातभार लागत असतो.मुलांच्या मेंदूचे वैशिष्ट्य :मानवी मेंदू ही मनुष्याला मिळालेली फार मोठी देणगी आहे. कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला टिकवून ठेवून अपेक्षित यश मिळवण्याचे सामर्थ्य मेंदूच देत असतो. कारण, ‘विलक्षण बदलशीलता’ हे मेंदूचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. कोणत्या परिस्थितीत कोणता निर्णय घ्यायचा, हे मेंदू शिकवतो. मेंदूच्या रचनेत स्थल, काल व प्रसंगानुसार वेगाने बदल होत असतात. त्यामुळेच त्याचा आधार घेतच या लहान मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर चांगले व वाईट असे दोन्ही परिणाम होत असतात. गरिबांची मुले सामान्यांसोबत, मध्यमवर्गीयांसोबत शिकायला हवीत. नव्हे तर त्यांचा तो अधिकारच आहे. हे आपण लक्षात घ्यायला हवे.त्याकरिताच आपल्याला मेंदूलाही इष्ट दिशेने बदलायला लावून ही मुले उत्तम पद्धतीने शिकू शकतील का, या प्रश्नावर काम करणे गरजेचे आहे. मेंदू आधारित अध्ययनाने हे सिद्ध केलं आहे की, या लहान वयातील मेंदू हा विकसित होताना अधिक प्रमाणात बदलशील असतो. त्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे सकारात्मक वर्तन मुलांच्या आयुष्यात झाले पाहिजे. आनंदी आणि मन जपणाºया भावना, व्यक्ती स्वातंत्र्याला वाव देणे, बुद्धिवादी विचारांची पेरणी करणे, संघर्ष, कष्ट आणि त्यातून छोट्यामोठ्या यशांची गोडी चाखायला देणे, लहानसहान प्रसंगांचा, अडचणींचा बाऊ न करणे, प्रयत्नांना भिडण्याची प्रेरणा देणे, मुलांवर प्रेम करून त्यांना नवनवे आव्हानात्मक अनुभव देणे, असे मुलांच्या मेंदूमध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. थोडक्यात काय तर मेंदूच्या ज्या भागांवर गरिबीमुळे विपरित परिणाम होतो, ते सर्व भाग बदलशील आहेत आणि अगदी प्रौढ वयापर्यंत त्यात बदल घडवून आणता येतो. त्यामुळे शिक्षणाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करून, गरीब-वंचित मुलांना चांगल्या शिक्षणाच्या संधी प्राप्त करून देता येतील आणि यामुळे त्यांची शालेय कामगिरी सुधारू शकेल.अंगणवाडीची भूमिका :विशेषत: गरीब मुलांना सर्वतोपरी सामावून घेण्यासाठी अंगणवाडीला अधिक सजग आणि समृद्ध व्हावे लागेल. यात केवळ भौतिक सुविधा नाहीत, तर बालमानसशास्त्र आणि बालअध्यापनशास्त्र यांची कास तितकीच समर्थपणे स्वीकारायला हवी. अंगणवाडीचे भावी रूप हे केवळ या सर्व लहान बालकांना संधी देणारे म्हणून सर्वसमावेशक असणार नाही, तर त्या मुलांना त्यांच्या बहुविध बुद्धिमत्तांना वाव देतानाच बुद्धी, भावना, भाषा आणि सामाजिकता यांच्या विकासासाठी संपन्न अनुभव देणारी अशी शिक्षणाची नवी मांडणी करणं कसं योग्य ठरेल, या विचारावर उभं राहायला हवं.अंगणवाडी ही मुळात या बालकांना आकर्षक आणि हवीहवीशी वाटली पाहिजे. बाह्य भागात सौंदर्यपूर्ण वातावरण आणि अंतर्गत भागात सुरक्षित व विश्वासाचं वातावरण असलं पाहिजे. आनंदी वातावरणाबरोबरच अंगणवाडीतार्इंकडून मिळणारे स्नेहपूर्ण अनुभव मुलांना शिक्षण घ्यायला उद्युक्त करतात.

टॅग्स :thaneठाणे