ठाण्यात खाडीमध्ये एका अज्ञातानं घेतली उडी; ४ तासांपासून शोधकार्य, अद्यापही बेपत्ता
By जितेंद्र कालेकर | Updated: March 20, 2023 13:18 IST2023-03-20T13:18:31+5:302023-03-20T13:18:52+5:30
पथकांनी एका बोटीच्या साह्याने सुमारे चार तासापासून शोधकार्य केले.

ठाण्यात खाडीमध्ये एका अज्ञातानं घेतली उडी; ४ तासांपासून शोधकार्य, अद्यापही बेपत्ता
ठाणे - कोपरीतील अष्टविनायक चौकाजवळील गणेश विसर्जन घाटाजवळील खाडीमध्ये एका अनोळखी व्यक्तीने सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उडी घेतली. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांनी एका बोटीच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो आढळून आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या अनोळखीने उडी घेतल्याची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी -पिकअप वाहनासह, अग्निशमन दलाचे जवान आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तातडीने दाखल झाले होते. या पथकांनी एका बोटीच्या साह्याने सुमारे चार तासापासून शोधकार्य केले. भरतीची वेळ असल्यामुळे आता शोधकार्य तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यस्थापन विभागाने दिली.