शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

१२ वऱ्हाड्यांना नवरदेवाच्याच वाहनाने चिरडले; उल्हासनगरमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 10:49 IST

उल्हासनगर येथील शांतीनगर भागात असलेल्या प्रवीण इंटरनॅशनल या हॉटेलमध्ये एक लग्न होते.

उल्हासनगरमध्ये सोमवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. चक्क एका वरातीत नाचता नाचता १२ वऱ्हाड्यांना नवरदेवाच्याच वाहनाने चिरडल्याची माहिती समोर आली आहे. या विचित्र अपघातामुळे एकच गोंधळ उडाला होता. आता या प्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दुर्घटनेत १२ वऱ्हाडी जखमी झाले असून एका जणाची प्रकृती चिंताजनक आहे. या रुग्णाला मुंबई येथील रुग्णालयात पाठवण्यात आले असून तीन जणांवर उल्हासनगर मधील मीरा एन एक्स रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तसेच ८ जखमींना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. उल्हासनगर येथील शांतीनगर भागात असलेल्या प्रवीण इंटरनॅशनल या हॉटेलमध्ये एक लग्न होते. यावेळी नवऱ्याचे वऱ्हाड हॉटेलच्या पार्किंगमध्ये पोहोचले असता, नवरदेवाचे वऱ्हाड त्याच्या कारच्या समोर नाचत होते. इतक्यात लग्नात नाचणाऱ्या १२ वऱ्हाड्यांना नवरदेवाच्या कारने चिडल्याची घटना घडली.

नेमकं काय घडलं?

उल्हासनगरातील प्रवीण हॉटेल मध्ये विशाल सुरेश लुधवानी यांचे सोमवारी दुपारी लग्न होते. लग्नाच्या बँडबाज्यांवर नवरदेवाच्या वऱ्याड्यांनी ठेका धरला होता. त्याच्या मागे नवरदेव विशाल लुधवानी यांची कार रोहित रिझवान चालवीत होता. मात्र अचानक विशालचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी नाचणाऱ्या वऱ्हाड्यांच्या अंगावर गेली. याप्रकारने सर्वत्र आरडाओरड व रडण्याचे आवाज घुमू लागले. गाडीखाली चिरडून तब्बल ११ जण गंभीर जखमी झाले. 

नवरदेव विशाल याने स्वतः नातेवाईकांच्या मदतीने जखमींना मध्यवर्ती रुग्णालय व काहींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. सर्वांची तब्येत धोक्याबाहेर असलेतरी, अनेक जण गंभीर झाले आहेत. नवरदेवाच्या गाडीने लग्नाच्या वऱ्हाडयाना चिरडल्याची माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाल्यावर, त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन नरवदेवाची गाडी ताब्यात घेतली. तसेच नवरदेवाची गाडी चालविणार्यावर रोहित रिझवान याला ताब्यात घेऊन अटक केली. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरAccidentअपघातthaneठाणेmarriageलग्न