पप्पू कलानीचा होणार एन्काऊंटर?, कलानी समर्थक कमलेश निकम यांनी व्यक्त केली भीती
By सदानंद नाईक | Updated: November 4, 2024 19:50 IST2024-11-04T19:50:04+5:302024-11-04T19:50:16+5:30
पोलीस आयुक्ताना देणार निवेदन

पप्पू कलानीचा होणार एन्काऊंटर?, कलानी समर्थक कमलेश निकम यांनी व्यक्त केली भीती
उल्हासनगर : पप्पू कलानी यांचे कट्टर समर्थक कमलेश निकम यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन कलानी यांना तडीपार किंवा एन्काऊंटर होण्याची भीती व्यक्त केली. त्या आरोपांनी शहरातील राजकारण ढवळून निघाले असून दुसरीकडे पप्पू कलानी पुत्र ओमी कलानी यांच्या प्रचारार्थ शहर पिंजून काढत आहेत.
उल्हासनगर म्हणजे कलानी असे समीकरण झाले असून सर्वच राजकीय पक्षांना कलानी हवे आहेत. दरम्यान जेलबाहेर असलेले पप्पू कलानी पुत्र ओमी कलानी यांच्या प्रचारासाठी निवडणूक जाहीर होण्यापूर्वी पासून शहर पिंजून काढत आहेत. कलानी समर्थक कमलेश निकम यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन कलानी वादळ रोखण्यासाठी एन निवडणुकीत पप्पू कलानी यांना तडीपार करण्याची अथवा एन्काऊंटर करण्याची भीती व्यक्त केली. गेल्या आठवड्यात भाजपा शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी केलेल्या भाषणावरही आशेप व्यक्त केला. तडीपार व एन्काऊंटर या भीतीतून पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, गृहमंत्री यांना याबाबत पत्र देणार असल्याचे निकम यांनी सांगितले.