शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

भडकलेल्या महिलेची पतीसह पोलिसांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 13:29 IST

निकिताने सारिका यांच्यासह पोलीस शिपाई निखिल मोरे यांना  अर्वाच्च शिवीगाळ, धक्काबुक्की केली.

मीरारोड : पतीने त्याच्या भावाविरुद्ध तक्रार द्यावी म्हणून पोलीस ठाण्यात धिंगाणा घालत पतीला शिवीगाळ, धक्काबुक्की करणाऱ्या निकिता कुर्डेकर (३२,  रा. श्रीधाम, गणेश गल्ली, नवघर मार्ग) या महिलेने पोलिसांनाही शिवीगाळ, धक्काबुक्की केली. बेभान झालेल्या निकिताने एका पोलिसाला चापट मारल्याने तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री हा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला होता. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास निकिता ही महिला पती नभिजितबरोबर नवघर पोलीस ठाण्यात आली. ती तिच्या नवऱ्याला शिवीगाळ करीत होती व येणाऱ्या कॉलवर आरडाओरडा करीत होती. पतीच्या भावाने जमीन खरेदीसाठी घेतलेले पैसे परत केले नाहीत म्हणून तक्रार देण्यास ती ओरडून सांगत होती; तर पती मात्र नकार देत होता. त्यातूनच तिचा पोलीस ठाण्यात गोंधळ सुरू झाला. निकिताने पतीला पोलीस ठाण्यात शिवीगाळ, धक्काबुक्की केली.

मोबाइलमध्ये शूटिंग --    सहायक उपनिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी निकिताला पोलीस ठाण्यात शांतता राखण्यास सांगितले असता तिने त्यांना शिवीगाळ करीत मोबाइलमध्ये शूटिंग करू लागली. -    जाधव यांनी मोबाइल कॅमेरा बंद करण्यास सांगताच निकिताने जाधव यांना चापट लगावली. -    ती शिवीगाळ करीत मारण्यासाठी जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याने त्यांनी तिला मागे ढकलले. -    गोंधळ ऐकून महिला उपनिरीक्षक सारिका वाघचौरे आल्या व त्यांनी निकिता हिला बाजूला केले. -    निकिताने सारिका यांच्यासह पोलीस शिपाई निखिल मोरे यांना  अर्वाच्च शिवीगाळ, धक्काबुक्की केली. -    अखेर निकिताविरुद्ध जाधव यांच्या फिर्यादीवरून शनिवार, ३ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWomenमहिलाhusband and wifeपती- जोडीदार