झोपडपट्टीतील मोबाईल टॉवर मुळे ८ वर्षाच्या मुलीला लागला विजेचा धक्का I
By धीरज परब | Updated: June 27, 2023 23:02 IST2023-06-27T23:02:09+5:302023-06-27T23:02:15+5:30
भाईंदर पश्चिमेस गणेश देवल नगर झोपडपट्टीत एका घरावरील मोबाईल टॉवर मुळे ८ वर्षीय मुलगी शॉक लागून जखमी झाली आहे.

झोपडपट्टीतील मोबाईल टॉवर मुळे ८ वर्षाच्या मुलीला लागला विजेचा धक्का I
मीरारोड - भाईंदर पश्चिमेस गणेश देवल नगर झोपडपट्टीत एका घरावरील मोबाईल टॉवर मुळे ८ वर्षीय मुलगी शॉक लागून जखमी झाली आहे.
गणेश देवल नगरच्या जनता नगर रोड गल्ली नंबर १३ समोर गौरव हरिनाथ प्रजापती हे कुटुंबासह राहतात . सदर गल्लीत गौरव यांच्या शेजारी राहणाऱ्या अशोक मौर्या यांनी घरावर मोबाईल टॉवर बसवला आहे. त्यासाठीच्या वीज पुरवठा करणाऱ्या केबल उघड्यावरून टाकलेल्या आहेत.
सध्या पाऊस पडत असल्याने सोमवारी रात्री गौरव यांची आठ वर्षांची मुलगी अंतिमा हिला विजेचा धक्का बसला व ती बेशुद्ध पडली. तिला भाईंदरच्या भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले .
सदर मोबाईल टॉवर मुळे येथील लोकांना शॉक लागण्याच्या अनेक घटना घडत असून सदर बेकायदेशीर मोबाईल टॉवर असल्याचा आरोप लोकांनी केला आहे. महापालिका व पोलिसांनी टॉवर हटवून गुन्हा दाखल करण्याची लोकांनी केली आहे.