शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अमराठी तरुणांना प्राधान्य; कंपनीस मनसेचा हिसका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 11:05 IST

MNS News: वागळे इस्टेट येथील एमी लाइफ सायन्स या कंपनीने अमराठी तरुणांना नोकरी देणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध केल्याने मनसेचे कार्यकर्ते  ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी कंपनीवर धडकले.

ठाणे : वागळे इस्टेट येथील एमी लाइफ सायन्स या कंपनीने अमराठी तरुणांना नोकरी देणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध केल्याने मनसेचे कार्यकर्ते  ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी कंपनीवर धडकले. मनसेने या जाहिरातीबाबत जाब विचारल्यावर कंपनी व्यवस्थापनाने जाहीर माफी मागून मराठी मुलांनाच नोकरी देणार असल्याची कबुली मनसैनिकांना दिली. या कंपनीत १०० टक्के मराठी मुलांची भरती केल्यास संचालकांचा आम्ही पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करणार असल्याचे मनसेने जाहीर केले. 

वागळे इस्टेट, निटको बिझनेस पार्क येथील एमी लाइफ सायन्स या कंपनीने भरतीसंदर्भात दिलेल्या जाहिरातीत कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर अमराठी मुलांना प्राधान्य दिले जाणार, असे लिहिले होते. ही माहिती मनसेचे मोरे यांना कळताच त्यांनी कंपनीवर धडक देऊन व्यवस्थापनाला जाब विचारला. त्यानंतर कंपनीचे संचालक निखिल देडिया यांनी मनसेची माफी मागत पुन्हा अशी चूक घडणार नाही व मराठी तरुणांनाच नोकरीत प्राधान्य दिले जाईल, असे मोरे यांना लिहून दिले. 

तर संबंधित जाहिरात ही बडोदा येथून प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्रातून जाहिरात दिली गेलेली नाही. याबद्दल येथील कार्यालयास काहीच कल्पना नव्हती. आम्ही मुंबई कार्यालयात असतो. मुळात मराठी-अमराठी हा भेदभाव स्वतःला मान्य नाही. ही जाहिरात मागे घेतली आहे. यापुढे आमच्या कंपनीत मराठी मुलांना प्राधान्य दिले जाईल, असे देडिया यांनी सांगितले.

टॅग्स :MNSमनसेthaneठाणे