पाणीटंचाईवर २६० बोअरवेलची मात्रा

By Admin | Updated: March 30, 2016 01:46 IST2016-03-30T01:46:10+5:302016-03-30T01:46:10+5:30

जिल्ह्यातील ५१९ गावपाड्यांना दरवर्षाप्रमाणे या वर्षीही तीव्र पाणीटंचाई आहे. पण जवळपासच्या विहिरी, डोह आदींच्या पाण्यावर तहान भागवणाऱ्या तेथील ग्रामस्थांसाठी आता बोअरवेलव्दारे

Amount of 260 borewells on water shortage | पाणीटंचाईवर २६० बोअरवेलची मात्रा

पाणीटंचाईवर २६० बोअरवेलची मात्रा

ठाणे: जिल्ह्यातील ५१९ गावपाड्यांना दरवर्षाप्रमाणे या वर्षीही तीव्र पाणीटंचाई आहे. पण जवळपासच्या विहिरी, डोह आदींच्या पाण्यावर तहान भागवणाऱ्या तेथील ग्रामस्थांसाठी आता बोअरवेलव्दारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केले आहे. त्यासाठी २६० बोअरवेल प्रस्तावित केल्या आहेत. त्यापैकी सर्वेक्षणांती १०३ बोअरवेल पात्र ठरल्या आहेत. त्यांचे काम लवकरच सुरू होणार आहे.
या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने एक कोटी ५६ लाख रूपये खर्च जि. प. अपेक्षित धरला आहे. मात्र १०३ ग्रामपंचायतींमध्येच बोअरवेलचेच काम हाती घेण्यात आले. शहरांमध्ये कडकडीत पाणीटंचाई सुरू आहे. मात्र ग्रामीण भागातही अधिपासून सुरू असलेल्या टंचाईवर मात करण्यासाठी तज्ज्ञांनी बोअरवेलचे काम हाती घेतले आहे. यासाठी ठिकठिकाणच्या २६० बोअरवेल पैकी गावखेड्यांमध्ये जाऊन २३६ ठिकाणचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. उर्वरित २४ बोअरवेलचे सर्वेक्षण अंबरनाथ तालुक्यात बाकी आहे. सर्वेक्षण झालेल्यापैकी १०३ ठिकाणे बोअरवेलसाठी पात्र ठरले आहेत. त्यांचे काम एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठाचे प्रभारी कार्यकारी अभियंता आर. डी. धांदवड यांनी लोकमतला सांगितले.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ४३० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात ८०९ गावपाडे आहेत. यातील १३२ गावे व ३८७ पाडे आदी ५१९ गावपाडे तीव्र पाणीटंचाईच्या चक्र व्युहात आहेत. यावर मात करण्यासाठी दोन कोटी ६४ लाख रूपये खर्चाची तरतूद जिल्हा प्रशासनाने केली आहे. पण आजपर्यंतही जिल्ह्यातील कोणत्याही गाव पाड्यातून टँकरची मागणी आलेली नसल्याचा दावा धांदवड यांनी केला आहे.

Web Title: Amount of 260 borewells on water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.