शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अमेरिकन आंब्याचा, तर ब्रिटिश चिकूचा झाला दिवाना, ठाणे जिल्ह्यातील फळे, भाजीपाला २३ देशांत निर्यात

By सुरेश लोखंडे | Updated: April 16, 2023 14:46 IST

Fruits and Vegetables Are Exporte:

- सुरेश लोखंडे ठाणे : मुंबईची तहान भागवून स्वत: टंचाईला तोंड देणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जगभरातील २३ देशात आंबा, चिकू, सीताफळ या फळांसह भेंडी, कारली, मिरची, दुधी भोपळा हा भाजीपाला आणि फूल व फळझाडे निर्यात केली आहेत. गेल्या वर्षभरात तीन कोटी रुपये किमतीची ४७३ मेट्रिक टन फळे, भाजीपाला आणि फळफुलांच्या रोपांची निर्यात केली. शहरी जिल्हा अशी ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्याचा कृषी माल आता परदेशात भाव खात आहे.

आतापर्यंत पावसाळी भाताच्या उत्पादनावर आणि मच्छीमारीच्या व्यवसायात समाधान मानणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शेतीमाल  परदेशात उत्तम भाव ‘खात’ आहे. खरिपाच्या भात या एका पिकावर शेतकरी अवलंबून होता. मात्र कृषी विभागाचा सततचा पाठपुरावा, शेतकऱ्यांमधील जनजागृती याची किमया साधून शेतकरी वर्षाकाठी तीन कोटींची उलाढाल करीत आहेत. कृषी माल निर्यात या धोरणाखाली जिल्ह्यातील कृषी अधिकारी आणि पणन विभागाने सागरी, नागरी, डोंगरी आदी दुर्गम भागातील शेती मालाला परदेशात बाजारपेठ उपलब्ध केली आहे.

जिल्ह्यातील शेतकरी सध्या समूह शेतीच्या माध्यमातून कृषी उत्पादनावर लक्ष केंद्रित करीत आहे. जिल्ह्यातील हा कृषी माल युनायटेड किंग्डम, यूएसए, न्यूझिलंड, संयुक्त अरब अमिरात, स्पेन, जर्मनी, जपान आदी देशांच्या बरोबरच थायलंड, ओमन, कतार, मॉरिशस, केनिया, इटली, फ्रान्स, इंडोनेशिया, कॅनडा, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया आदी देशातील बाजारपेठेत विक्रीला जात आहे. त्यापोटी वर्षभरात तीन कोटी रुपये उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाल्याची माहिती ठाणे जिल्हा कृषी अधीक्षक दीपक कुटे यांनी दिली. अन्नधान्यात मका, फळे, भाजीपाला, फळझाडे, फुलझाडे, घरातील शोभेच्या वनस्पती आदी ४७२.७३ मेट्रिक टन कृषी माल व रोपांची निर्यात तब्बल ४३७ प्रमाणपत्राद्वारे  करण्यात आली. या निर्यातीसाठी ४६३ प्रमाणपत्रे निश्चित केली होती. मात्र त्यापैकी २६ प्रमाणपत्राद्वारे होणारी निर्यात ऐनवेळी रद्द झाली. यामध्ये आयरलँडकडून नऊ ऑर्डर, तर युनायटेड किंग्डमने दहा, यूएसएने दोन ऑर्डर रद्द केल्या.

परदेशात  पुरवठा झालेल्यांमध्ये  आंबा, चिकू, डाळिंब, सीताफळ, फणस, काकडी याचा समावेश आहे.   याखेरीज रेगिस्तानी गुलाब, घरातील व टेरेसच्या सजावटीचे, हवा शुद्धीकरणाची रोपटी, भाजीपाल्यामध्ये वांगी, कारली, भेंडी, दुधीभोपळा, आलं, लसूण आणि अन्नधान्यात मका आदी ३२ लाख ६३ हजार ४९९ नगांचा पुरवठा गेल्या वर्षभरात विमान, जहाजांद्वारे सातासमुद्रापार नेले आहे.

टॅग्स :Mangoआंबा