शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अखेर दिवा स्थानकाला मिळणार रुग्णवाहिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 20:05 IST

रेल्वे पोलीस सूत्रांची माहिती; दिवा रेल्वे प्रवासी संघटनेची होती मागणी

अनिकेत घमंडी

डोंबिवली - दिवारेल्वे स्थानकाला जंक्शनचा दर्जा असूनही या स्थानकातील गैरसोयींकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दिवा ते कळंबोली कोकण रेल्वे मार्गावर आणि मुख्य मार्गावर रेल्वे अपघातांची संख्या लक्षणिय असूनही येथे पूर्ण वेळ रुग्णवाहिका नसल्याने प्रवाशांची हेळसांड होत असल्याचे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेने वेळोवेळी झालेल्या अपघातानंतर रेल्वेच्या नीदर्शनास आणले होते. त्याची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेत या स्थानकातही रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध होणार आहे.

प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. आदेश भगत यांना सोमवारी पोलिस सूत्रांनी ही माहिती दिली. भगत हे मध्य रेल्वेच्या उपनगरिय रेल यात्री उपभोक्ता समितीचे सदस्य असून त्यांनी यासंदर्भात रेल्वे अधिका-यांसमवेत झालेल्या बैठकांमध्ये आवाज उठवला होता. भगत म्हणाले की, अपघात कमी होत नाहीतच, पण अपघातानंतर जखमींना अथवा मृतांना तातडीने वैद्यकिय मदत मिळण्यासाठी रुग्णवाहिके आभावे ताटकळावे लागते. त्यामुळे अनेकदा जखमी प्रवाशांचे विव्हळणे बघवत नाही, अनेकांना वेळेवर उपचार न मिळाल्यास त्यांच्या जिविताचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी या ठिकाणी रुग्णवाहिका असणे आवश्यक होते. लोहमार्ग पोलिस सूत्रांच्या माहितीनूसार रेल्वेने दिवा स्थानकात ती सुविधा देण्याचे मान्य केले आहे. लवकरच या ठिकाणीही वाहन उपलब्ध होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आॅक्टोबरमध्ये दिव्यातील रेल्वे अपघात* ७ आॅक्टोबर - आगासन फाटक जवळ एकाला एक्सप्रेस ची धडक, रुग्णवाहिका नसल्याने मृतदेह टेम्पोमध्ये टाकून दिवा स्थानकात आणला गेला पुढे लोकल ने सिव्हिल हॉस्पिटल ठाणे येथे रवाना.* १५ आॅक्टोबर - कळंबोली- दिवा दरम्यान जवळ झालेल्या अपघातात रुग्णवाहिका नसल्याने ८ तास मृतदेह ताटकळला. ऐन सकाळी गर्दीच्या वेळेस मृतदेह अगोदर दिवा रोहा पॅसेंजरने व नंतर लोकलने हॉस्पिटल मध्ये पोहचवला.* २२ आॅक्टोबर - दोन बहिणींना जलद लोकलची धडक, तब्बल एक तासांनी जखमी महिलेला सकाळी ८:१८ च्या लेडीज स्पेशल लोकल ने ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वेdivaदिवा