शिवसेनेच्या आवाहनाला अंबरनाथकरांचा चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:41 IST2021-07-30T04:41:53+5:302021-07-30T04:41:53+5:30
अंबरनाथ : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोकणातील पूरग्रस्तांना मदत पाठविण्यात आली. शिवसेनेने केलेल्या आवाहनाला ...

शिवसेनेच्या आवाहनाला अंबरनाथकरांचा चांगला प्रतिसाद
अंबरनाथ : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोकणातील पूरग्रस्तांना मदत पाठविण्यात आली. शिवसेनेने केलेल्या आवाहनाला अंबरनाथमधील सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापाऱ्यांनी चांगली साथ दिली असून दोन ट्रक भरून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पूरग्रस्तांना करण्यात आला आहे.
कोकणातल्या महाड, चिपळूण, खेड, तसेच कोल्हापूर या भागात पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा माझा वाढदिवस साजरा न करता या पूरग्रस्तांना मदत करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यानुसार अंबरनाथच्या शिवसेना शहर शाखेने शहरातील व्यापारी, उद्योजक, कारखानदार यांना मदतीचे आवाहन केले होते. त्याला अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला. यानंतर मोठ्या प्रमाणात जमा झालेली मदत घेऊन बुधवारी शिवसैनिक कोकणाच्या दिशेने रवाना झाले. अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या पुढाकाराने ही मदत कोकणवासीयांना पाठविण्यात आली आहे.