शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

बदलापूरमध्ये राबवणार ‘अंबरनाथ पॅटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 02:22 IST

प्रश्न पाणीवितरणाचा; आठवड्यातून दोनदा १५ तासांची केली जाणार कपात

अंबरनाथ: पाणीटंचाई लक्षात घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ३० तासांची पाणीकपात लागू केली होती. ही कपात सरसकट केली जात असल्याने त्याचा परिणाम हा दोन ते तीन दिवस राहतो. सलग दोन ते तीन दिवस पाणी येत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आता बदलापूरमध्येही प्राधिकरणाने अंबरनाथ पॅटर्न राबवण्याचे काम हाती घेतले आहे. सलग ३० तास पाणीकपात न घेता आठवड्यातून दोन वेळा १५-१५ तासांची कपात केली जाणार आहे. अंबरनाथमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे.बदलापूरमध्ये पाणीटंचाईमुळे टँकरलॉबी सक्रिय झाल्याने याप्रकरणी संताप व्यक्त होत होता. शहरात अनेक ठिकाणी जीवन प्राधिकरण पाणी पोहोचवू शकत नसल्याने या भागात टँकरशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यातही टँकरमालक वाढीव दर आकारत असल्याने नागरिकांना दुहेरी त्रास सहन करावा लागतो. शहरातील पाणीसमस्या वाढत असल्याने प्राधिकरणाने नवीन प्रयोग हाती घेतला आहे. सलग ३० तास पाणी बंद ठेवल्याने दुसऱ्या आणि तिसºया दिवशीही पाणीवितरणात अडचणी येतात. त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी प्राधिकरणाने शहराचे चार विभाग करून प्रत्येक विभागानुसार आठवड्यातून दोन वेळा १५ तासांची पाणीकपात घेतली जाणार आहे. पाणीसमस्येवर तोडगा काढत असताना १५ तासांची कपात घेतल्याने वितरणव्यवस्थेत सुधारणा करण्यास मदत होणार आहे. ३० तासांच्या कपातीमुळे सर्व जलवाहिन्या या कोरड्या पडत असल्याने वितरण सुरू झाल्यावर कोरड्या पडलेल्या वाहिन्या भरण्यातच वेळ वाया जातो. त्यामुळे जलवाहिन्या कोरड्या पडणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे सातत्याने प्राधिकरणाच्या कार्यालयावर नागरिकांचे मोर्चे निघत होते.अतिरिक्त पाण्यासाठी पाठपुरावा सुरूशहरासाठी जे ३० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी मंजूर झाले आहे, ते लवकरात लवकर नागरिकांना मिळावे, यासाठी पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात कार्यकारी अभियंता मनीषा पालंडे यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी या अतिरिक्त पाण्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र हे वाढीव पाणी बारवी धरणावर अवलंबून असल्याने या धरणाचे काम पूर्ण झाल्यावरच बदलापूरला अतिरिक्त पाणी मिळणार आहे. मात्र बारवी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अजूनही पूर्णपणे सुटलेल्या नसून जून महिन्यापर्यंत त्यांचा प्रश्न सोडविण्यात यश आले तरच बदलापूरकरांची तहान भागणार आहे. हीच परिस्थिती अंबरनाथ शहराची असून बारवीच्या पाण्यावर २० दशलक्ष लिटर आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही शहरांचा विचार करता ५० दशलक्ष पाण्यासाठी प्राधिकरणाला प्रतीक्षा करावी लागणार आहे.नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी टॅँकरवर अवलंबून असलेल्या परिसरात प्राधिकरणाने लक्ष देण्यासंदर्भात मागणी केली होती. त्यानुसार, प्राधिकरणाने लक्ष केंद्रित केले आहे. तसेच पालिका ज्या पद्धतीने प्रत्येक टँकरमागे ६०० आणि ८०० रुपये आकारत आहे, तशाच पद्धतीने प्राधिकरणाने खाजगी टँकरचालकांनाही दर निश्चित करून त्या दराने पाणी देण्याची सक्ती करावी, अशी मागणी केली होती. त्यावरही प्राधिकरणाचे अधिकारी निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

टॅग्स :ambernathअंबरनाथbadlapurबदलापूरwater transportजलवाहतूक