शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
2
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
3
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
4
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
5
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
6
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
8
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
9
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
10
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
11
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
12
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
13
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
14
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
15
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
16
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
17
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
18
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
19
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
20
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले

पार्किंगचा प्लॉट अंबरनाथ पालिकेने गमावला, नगरसेवक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 01:17 IST

अंबरनाथ नगरपालिका कार्यालयासमोरील पालिकेच्या पार्किंगची जागा वकिलाच्या चुकीमुळे गमावण्याची वेळ आली आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका कार्यालयासमोरील पालिकेच्या पार्किंगची जागा वकिलाच्या चुकीमुळे गमावण्याची वेळ आली आहे. पार्किंगच्या प्लॉटवर त्रयस्थ व्यक्तीने दावा केल्याने तो प्लॉट संबंधित व्यक्तीकडे वर्ग केला आहे. हे करत असताना पालिकेच्या वकिलाने या प्लॉटची पालिकेला गरज नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिल्याने तो प्लॉट हातातून गेल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात नगररचना विभागाने प्लान मंजूर करण्याची कोणतीही घाई करू नये, अशी ओरड सभागृहात करण्यात आली.अंबरनाथ नगरपालिका कार्यालयासमोरच पार्किंगचा प्लॉट होता. त्यावर अतिक्रमण असल्याने तत्कालीन मुख्याधिकारी राजेश कानडे यांनी कारवाई करत हा प्लॉट मोकळा केला होता. मात्र, हा प्लॉट मोकळा करण्यामागे वेगळेच कारण होते, हे समोर आले आहे. एकीकडे प्लॉट मोकळा झालेला असताना त्याचा ताबा हा त्रयस्थ व्यक्तीला देण्यात आला होता. त्याला तो प्लॉट मोकळा करणे शक्य नसल्याने पालिकेला हाताशी धरून तोरमोकळा करण्यात आला. प्लॉट मोकळा होताच त्या ठिकाणी एका खाजगी व्यक्तीने दावा करत हा प्लॉट मिळवला. अर्थात, त्यासंदर्भातील सर्व कायदपत्रे नियमानुसारही तयार करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांना काही अटी व शर्तींवर तो प्लॉट दिलाही.वरवर हे प्रकरण साधे वाटत असले, तरी त्यामध्ये प्रशासनाचे अधिकारी आणि पालिकेची बाजू मांडणारे वकीलही सहभागी असल्याचे शुक्रवारी सभागृहात उघड झाले. हा प्लॉट देताना पालिकेच्या वकिलांनी थेट या प्लॉटची पालिकेला गरज नाही, असे न्यायालयात स्पष्ट केले. वकिलाचे म्हणजे पालिकेचे म्हणणे असल्याने न्यायालयानेही संबंधित व्यक्तीच्या बाजूने निकाल दिला आहे. निकाल लागल्यानंतर यासंदर्भात वरिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी त्याची कल्पना पालिकेला देणे गरजेचे होते. मात्र, संबंधित वकिलांनी निकाल लागल्यानंतर तब्बल वर्षभरानंतर त्याची माहिती पालिकेला दिली.ज्या वकिलांची नेमणूक पालिकेची बाजू मांडण्यासाठी करण्यात आली होती. मात्र, त्यांनी पालिकेच्या विरोधातच काम केल्याचा आरोप नगरसेवकांनी सभागृहात केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या प्लॉटवरील आलेला प्रस्ताव थांबवण्याची मागणी करण्यात आली. नगररचना विभागाने या जागेवरील आलेल्या प्रस्तावाबाबत निर्णय घेताना सभागृहाची परवानगी घ्यावी, अशी मागणी यावेळी नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी केली.रुग्णवाहिका नसल्याने नगरसेवकाचा संतापअंबरनाथ नगरपालिकेच्या छाया रुग्णालयाचे हस्तांतरण सरकारकडे करताना पालिकेच्या रुग्णवाहिका आणि शववाहिनी सरकारकडे वर्ग करण्यात आल्या. त्यामुळे आता पालिकेच्या ताब्यात एकही रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांना मुंबईला नेताना त्रास सहन करावा लागत आहे.पालिकेने ही सेवा पुरवण्याची गरज असतानाही पालिका त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगरसेवक उमर इंजिनीअर यांनी केला. आपली मागणी मान्य होत नाही, तोवर सभागृहातील खुर्चीवर न बसता जमिनीवर बसण्याचा निर्णय घेतला.अखेर, यासंदर्भात इतर नगरसेवकांनीही इंजिनीअर यांची साथ दिल्यावर निविदा मागवत नवीन रुग्णवाहिका आणि शववाहिनी मागवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ही निविदा प्रक्रिया तत्काळ राबवण्याचे आदेश नगराध्यक्षांनी दिले.रस्त्याच्या विषयावर काँग्रेसचा सभात्यागअंबरनाथ येथील विम्कोनाका ते गावदेवी रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झालेले असतानाही या रस्त्याची रुंदी वाढवण्याचा विषय घेण्यात आला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही असा ठराव केला जात असल्याने काँग्रेसचे नगरसेवक विलास जोशी यांनी या विषयाला विरोध करत सभात्याग केला.तोडलेले स्वच्छतागृह धुतल्याचे बिलअंबरनाथ नगरपालिकेच्या चिंचपाडा भागात एक स्वच्छतागृह तोेडण्यात आलेले असतानाही तेच स्वच्छतागृह नियमित धुण्यात येत असल्याचे दाखवत पालिकेने संबंधित कंत्राटदाराला बिल दिल्याचा आरोप नगरसेविका वृषाली पाटील यांनी केला आहे. तसेच स्वच्छतागृह धुण्याचे काम महिला बचत गटांना देण्याचा विषय असताना काम मागण्यासाठी गेलेल्या महिला बचत गटांकडून ३० हजारांची लाच मागण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.

टॅग्स :thaneठाणे