शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ, बदलापूरला दिवसाआड पाणीपुरवठा,  बारवी, आंध्र धरणांतील साठ्यात घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 03:27 IST

नवीन वर्षात अंबरनाथ, बदलापूर शहरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंध्र या दोन्ही धरणांच्या साठ्यात घट झालेली आहे.

बदलापूर - नवीन वर्षात अंबरनाथ, बदलापूर शहरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंध्र या दोन्ही धरणांच्या साठ्यात घट झालेली आहे. जिल्ह्यात आठवड्यातून ३० तास पाणीकपात करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने ११ डिसेंबर २०१८ च्या झालेल्या बैठकीत घेतला आहे.जानेवारीच्या दुसºया आठवड्यापासून बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरांना धरणातून होणारा पाणीपुरवठा यापुढे एक दिवसाआड होणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी पाणीटंचाईला सहकार्य करावे व पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. तसेच गळतीचे प्रमाणही वाढत आहे. त्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी गांभीर्याने कधी बघणार, असा सवाल नागरिक विचारत आहेत.यापूर्वी अंबरनाथ आणि बदलापूर शहरांत आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्यात येत होती. मात्र, पाणीटंचाईच्या झळा आता यापुढे अधिक प्रकर्षाने जाणवणार आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर ही पाणीकपात लागू होणार असल्याने यापुढील काळात नागरिकांना उन्हाळा जसजसा जवळ येईल, तसतसा पाणीकपातीचा आणखीनच सामना करावा लागणार आहे.मागील काही दिवसांपासून अंबरनाथ आणि बदलापूरच्या अनेक भागांत पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यातच, एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याने बदलापूर, अंबरनाथमधील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. पाणीटंचाईला नागरिकांनी सहकार्य करावे व पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.  टंचाईग्रस्त अंबरनाथकरांनी रोखला महामार्गअंबरनाथ : नियमित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांनी हंडा आणि कळशा घेऊन कल्याण-बदलापूर महामार्ग बुधवारी सकाळच्या वेळेस काही काळ रोखून धरला होता. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर महामार्ग सुरळीत करण्यात आला. पाणीकपात आणि अनियमित येणारे पाणीही येत नसल्याने बुवापाडा परिसरातील नागरिकांना हंडा, कळशा घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.बुवापाडा येथे मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने येथील नागरिकांनी संतप्त होऊन कल्याण-बदलापूर महामार्ग रोखून धरला. यामुळे काही काळ कोंडी झाली होती. जोपर्यंत जीवन प्राधिकरणाचे अधिकारी येऊन पाणीपुरवठा नियमित करण्याचे आश्वासन देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका घेतल्याने अर्धा तास महामार्ग रोखून धरला होता. शेवटी, पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. पाणीखात्याचे अधिकारी टंचाईग्रस्त भागातील नागरिकांची बैठक बोलावून मार्ग काढण्याचे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.लघुपाटबंधारे खात्याच्या सूचनेवरून पाणीपुरवठा सोमवारी बंद ठेवण्यात येत असल्याने त्यापुढे पाण्याची पातळी वाढण्यास काही कालावधी लागतो. मात्र, बुवापाडा भागात भेडसावणारी पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी लक्ष देणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एस.डी. शिंदे यांनी दिली.

टॅग्स :Waterपाणीbadlapurबदलापूर