Ambernath: राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत अंबरनाथचा खेळाडू चमकला
By पंकज पाटील | Updated: April 13, 2023 18:39 IST2023-04-13T18:38:39+5:302023-04-13T18:39:10+5:30
Ambernath: नुकत्याच नांदेड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय टायकोंडो स्पर्धेत अंबरनाथच्या खेळाडूंन चांगले यश मिळवले आहे. मुसा अकबरअली शेख असे या बाळ खेळाडूचं नाव असून त्यांने या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

Ambernath: राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत अंबरनाथचा खेळाडू चमकला
- पंकज पाटील
अंबरनाथ - नुकत्याच नांदेड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय टायकोंडो स्पर्धेत अंबरनाथच्या खेळाडूंन चांगले यश मिळवले आहे. मुसा अकबरअली शेख असे या बाळ खेळाडूचं नाव असून त्यांने या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
ब आठ वर्षीय मुसा हा गेल्या वर्षभरापासून या सुवर्ण कामगिरीसाठी प्रचंड मेहनत घेत होता. त्याचे प्रशिक्षक राजेश शिंदे यांनी देखील मुसा याच्याकडून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी चांगली तयारी करून घेतली होती. अंतिम स्पर्धेत त्यानं चमकदार कामगिरी करत प्रतिस्पर्धी खेळाडूचा पराभव केला. मुसा याच्या या सुवर्ण कामगिरीनंतर अंबरनाथमध्ये त्याच्यावर अभिनंदननाचा वर्षाव होतो आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत यश संपादन केल्यानंतर आता राष्ट्रीय स्तरावर मुसाने अशीच चमकदार कामगिरी करावी अशी अपेक्षा अंबरनाथकर व्यक्त करत आहे