भाजपा प्रवेशापूर्वीच ओमींसोबत जागावाटप
By Admin | Updated: January 25, 2017 04:49 IST2017-01-25T04:49:46+5:302017-01-25T04:49:46+5:30
ओमी कलानी यांच्या भाजपातील प्रवेशाची औपचारिकताच शिल्लक असल्याने दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी जागावाटपाची चर्चा सुरू

भाजपा प्रवेशापूर्वीच ओमींसोबत जागावाटप
उल्हासनगर : ओमी कलानी यांच्या भाजपातील प्रवेशाची औपचारिकताच शिल्लक असल्याने दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी जागावाटपाची चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे फुटीचा इशारा देणाऱ्या नेत्यांना आनंदाचे भरते आले आहे, तर आजवर पक्षाच्या स्थानिक नेतृत्त्वाची धुरा सांभाळणाऱ्या कुमार आयलांनी यांच्या नेतृत्त्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वाटाघाटी पूर्ण होऊन दोन दिवसांत उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, असे पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
ओमी कलानी यांच्या भाजपा प्रवेशच्या घोळामुळे महायुतीच्या चर्चेत खीळ बसली होती. आघाडीची चर्चाही खोळंबली होती. आता मात्र ओमींचा प्रवेश ही औपचारिकता उरल्याने भाजपातील जिल्हास्तरीय नेते, स्थानिक नेते यांनी ओमी टीमसोबत जागावाटपाची चर्चा सुरू केली. सध्याच्या चर्चेनुसार दोन्हीकडील विद्यमान नगरसेवकांची तिकिटे कापली जाणार नाहीत. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. इतर जागांवर फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. तो मान्य होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजपातील फुटीर गट आणि ओमी टीमचे सदस्य आता उघडपणे एकत्र फिरताना दिसत आहेत. (प्रतिनिधी)