शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील वर्तकनगरचे तिघेही पोलीस झाले कोरोनामुक्त: ठाणे मुख्यालयाच्या एकाला झाली लागण

By जितेंद्र कालेकर | Updated: April 30, 2020 00:47 IST

ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची बाब मंगळवारी समोर आली. त्याचवेळी वर्तकनगर पोलीस ठाण्यातील कोरोनामुक्त झालेल्या एका पोलीस कर्मचा-याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तर अन्य दोघांचीही चाचणी निगेटीव्ह आल्याने वर्तकनगर पोलिसांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

ठळक मुद्दे २४ अधिकाऱ्यांसह १२७ पोलीस विलगीकरणामध्येवर्तकनगरचे सर्व पोलीस आता कोरोनामुक्त

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वर्तकनगर पोलीस ठाण्याचे तिन्ही पोलिसांची कोरोना चाचणी ही निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे या तिघांनाही लवकरच रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. आतापर्यंत ठाणे शहर आयुक्तालयातील चार अधिकारी आणि चार कर्मचारी अशा आठ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या २४ अधिकारी आणि १०३ कर्मचारी अशा १२७ पोलिसांना विलगीकरणात ठेवले आहे.गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरणातील सहा पैकी दोन आरोपींना कोरोनाची लागण झाली होती. याच आरोपींच्या संपर्कातील वर्तकनगरच्या २२ कर्मचाºयांची सुरुवातीला कोरोनाची तपासणी झाली. त्यात तीन कर्मचाºयांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या तिघांनाही तातडीने ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मंगळवारी यातील एकाची चाचणी निगेटीव्ह आली. तर बुधवारीदोघांचीही चाचणी निगेटीव्ह आली. दरम्यान, या तिघांना कोरोनाची लागण झाल्यामुळे या एकाच पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह ९५ कर्मचाºयांची तपासणी करण्यात आली. त्याचवेळी वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांचीही तपासणी झाली. या सर्वांची चाचणी निगेटीव्ह आली होती. या ९५ कर्मचाºयांमध्ये केवळ तीन कर्मचारी वगळता ९२ जणांचे अहवालही निगेटीव्ह आले. तर उर्वरित तिघांनीही आता कोरोनावर मात केल्यामुळे वर्तकनगर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. बुधवारी रात्री उशिरा सफायर रुग्णालयातून वर्तकनगरच्या एका कर्मचाºयाला कळवा येथील सफायर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यावेळी वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ, वर्तकनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच ते वास्तव्यास असलेल्या नवीन पोलीस वसाहतीमधील पोलीस कुटूंबीयांनीही त्यांचे टाळया वाजवून पुष्पवृष्टी करीत त्यांचे स्वागत केले.* दरम्यान, ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील आणखी एकाला मंगळवारी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे मुख्यालयातील कोरोनाबाधितांची संख्या सातवर पोहचली आहे. तर ठाणे शहर आयुक्तालयात २३ पैकी चार कर्मचारी आणि चार अधिकारी असे आठजण कोरोनामुक्त झाल्यामुळे ही संख्या १५ झाली.* कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील २४ अधिकारी आणि ९४ कर्मचाºयांना होम कॉरंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे. तर नऊ कर्मचाºयांना केंद्रात कॉरंटाईन ठेवले आहे. यामध्ये वर्तकनगरचे तीन अधिकारी आणि २८ कर्मचारी, मुंब्रा येथील सहा अधिकारी ३८ कर्मचारी तर मुख्यालयातील २४ कर्मचाºयांचा समावेश आहे.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस