उल्हासनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधासाठी सर्वपक्षीय नेते छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आले होते. यावेळी सर्वांनी पाकिस्तान विरोधी घोषणांनी दणाणून गेले. आंदोलनात आमदार कुमार आयलानी, जमनू पुरस्वानी, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, काँग्रेचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्यासह अन्य पक्षाचे नेते उपस्थित होते.
उल्हासनगर कॅम्प नं-३, छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवारी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. यावेळी पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या. निषेध आंदोलनात आमदार कुमार आयलानी, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रोहित पवार, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे, मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, भाजपचे जमनुदास पुरस्वानी, पीआरपीचे प्रमोद टाले यांच्यासह विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच बुधवारी रात्री भाजपाचे आमदार कुमार आयलानी, जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी आदींनी कँडल मार्चद्वारे मृतकाना श्रद्धांजली अर्पण केली. तर शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कॅम्प नं-५ आंदोलन करून येथे हल्ल्यातील आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.