शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उत्तन येथील सर्व मासेमारी बोटी सुरक्षित; किना-यावरील साहित्यांचे मात्र किरकोळ नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 19:31 IST

भार्इंदर - पश्चिम समुद्र किनारपट्टीवरील समुद्रात ओखी वादळामुळे जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार उत्तन येथील सर्व मासेमारी बोटी सोमवारी सायंकाळपर्यंत तेथील जेट्टींलगत नांगरण्यात आल्या.

राजू काळेभार्इंदर - पश्चिम समुद्र किनारपट्टीवरील समुद्रात ओखी वादळामुळे जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार उत्तन येथील सर्व मासेमारी बोटी सोमवारी सायंकाळपर्यंत तेथील जेट्टींलगत नांगरण्यात आल्या. त्यामुळे तूर्तास त्या सुरक्षित असून किना-यावरील मासळी सुकविण्याच्या जागेतील साहित्यांचे मात्र किरकोळ नुकसान झाल्याचे पाली मच्छीमार सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी सांगितले.बोटींना समुद्रात मच्छीमारीसाठी जाण्यास बंदी घालण्यात आल्याने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सोमवारीच जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनांना सावधनतेचा इशारा दिला होता. त्यानुसार मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी देखील पश्चिम किनारपट्टीवरील शहराच्या हद्दीतील भाटेबंदर ते पाली दरम्यानच्या मच्छिमारांना अतिदक्षतेचा इशारा दिला होता. पालिकेसह जिल्हाप्रशासन व उत्तन-सागरी पोलिसांनी किना-याचा ताबा घेत समुद्रात जाणा-यांना रोखले. दर १५ मिनिटांनी वादळाचा वेध घेत किना-यावरील मच्छीमारांना जागरुक राहण्यासाठी त्याची माहिती दिली जात होती.दरम्यान सोमवारी सायंकाळपर्यंत किना-यावरील सर्व बोटी किना-यावरील जेट्टींलगत सुरक्षितपणे नांगरण्यात आल्या. मंगळवारी मध्यरात्री समुद्रातील मोठ्या भरतीमुळे पाण्याची पातळी वाढली होती. मात्र त्यात किना-यावरील काही साहित्यांचे किरकोळ नुकसान झाल्याचे डिमेलो यांनी सांगितले. तसेच उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार साळुंखे यांनी सांगितले कि, गेल्या तीन दिवसांपासुन किना-यावरील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देणे सुरु होते. त्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटी वेळेतच किना-यावर नांगरण्यात आल्या. तरीदेखील पोलिसांची किना-यावर गस्त सुरु असुन वादळाचा आढावा सतत घेतला जात आहे. ओखी वादळामुळे शहरात सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पावसाची रिमझिम सुरु झाली. ती मंगळवारीही कायम होती.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरOckhi Cycloneओखी चक्रीवादळ