शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार बुधवारी शहापुरात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 00:58 IST

शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केल्याने तेथील पक्षांची घडी विस्कटली आहे.

ठाणे : शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केल्याने तेथील पक्षांची घडी विस्कटली आहे. याप्रमाणेच मुरबाडमध्येही राष्टÑवादीत चलबिचल सुरू आहे. या बालेकिल्ल्यांचे ढासळत असलेले बुरूज वेळीच सावरून शिवसेनेला रोखण्यासह विखुरलेल्या राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सावरण्यासाठी राष्टÑवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार हे शहापूरला १७ जुलैला येऊन मोठी सभा घेणार आहेत. त्यासाठी गर्दी जमवण्याची तयारी सध्या जोर धरू लागली आहे.राष्टÑवादी सोडून पक्षाचे आमदार शिवसेनेत जाताच पक्षाच्या एका गटाने बारामतीत जाऊन पवार यांची भेट घेऊन ग्रामीण जिल्हाध्यक्ष व तालुकाप्रमुख यांच्या कामगिरीचा पाढाच पवारांना ऐकवला आहे. यामुळे भेटीदरम्यान अध्यक्षांसह तालुकाप्रमुखांचीदेखील झाडाझडती घेण्याचे पवार यांनी कार्यकर्त्यांना ऐकवले आहे. यामुळे बुधवारी मोठ्या सभेच्या शक्तिप्रदर्शनानंतर राष्टÑवादी काँग्रेसच्या ग्रामीण नेतृत्वबदलाचे वारेदेखील वाहू लागले आहेत. तर, जबाबदारी स्वीकारून राष्टÑवादीचा बालेकिल्ला पूर्ववत करण्याचा विडा उचलणाऱ्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून सभेची तयारी सुरू केली आहे.स्वपक्षाचे आमदार असतानाही येथील राष्टÑवादीच्या नेत्यांनी पेसा कायद्याविरोधात रान उठवले. शहापूर विधानसभा मतदारसंघ १०० टक्के पेसामध्ये समाविष्ट आहे. सर्वाधिक आदिवासी समाज असल्यामुळे पेसा कायद्याखाली येथील ग्रामपंचायतींसह अन्य निवडणुकांसाठी आदिवासींना प्राधान्याने उमेदवारी मिळत आहे. याचा राग मनात ठेवून राष्टÑवादीच्या येथील नेत्यांनी आदिवासी समाजहिताविरोधात पेसा कायदा बंद करण्याचा उपक्रमच राष्टÑवादीने हाती घेतला. त्यामुळे येथील जिल्हा परिषदेचे सदस्यदेखील निवडणुकीत पडले. आमदारकीलादेखील पक्षाच्या पेसाविरोधाचा फटका बसण्याची भीती लक्षात घेऊन वरिष्ठ नेत्यांना त्याची कल्पना देऊन बरोरा यांनी राष्टÑवादी सोडून आता शिवसेनेशी घरोबा केला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार हे बुधवारी शहापुरातयेत आहेत.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार