शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू

By नितीन पंडित | Updated: May 6, 2024 00:57 IST

प्रशांत सुरेश भोईर (३०) असे मयत इसमाचे नाव, अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: अजित पवार गटाचे शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या खाजगी पीएचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावरील रांजणोली गावाच्या हद्दीत एका बार समोर रविवारी रात्री घडली आहे.याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत सुरेश भोईर (वय, ३० रा. वाशिंद ) असे अपघातात मृत्यू झालेल्या स्वीय सहाय्यकाचे नाव आहे.

मयत प्रशांत हा वाशिद मध्ये कुटूंबासह राहून अजित पवार गटाचे शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांचे खाजगी पीए म्हणून कार्यरत होते.रविवारी मध्यरात्री तक्रारदार रवींद्र गणपत मडके (वय ३८ रा.चेरपोली शहापूर) हे मित्रांसह कारमधून मुंबई नाशिक महामार्गावरील रांजणोली गावाच्या हद्दीत एका बारमध्ये आले. त्यावेळी प्रशांत हा दोन मित्रांसह दुसऱ्या कारमधून त्याच बारमध्ये आला. मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांनी बार बंद झाल्याने तक्रारदार रवींद्र मडके व त्यांच्या सोबते मित्र घरी जाण्यास निघाले. मात्र प्रशांत ज्या कारमधून आला होता, त्या कारचालक मित्राने  तक्रारदार रवींद्र यांना मोबाईलवर संपर्क करून सांगितले की, प्रशांत आमच्या कारमध्ये नाही. तुम्ही येताना त्याला कार मधून घेऊन या, असा निरोप दिला.

मडके यांनी कार पुन्हा बारकडे वळवून आणली असता, मुंबई नाशिक महामार्गावरील स्वागत बार समोर प्रशांत गंभीर जखमी अवस्थेत पडून होता. ही घटना पाहताच दोन्ही कारमधील मित्रांनी जखमी प्रशांतला नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला कार्डिओ रुग्णवाहिकेतून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथील रुग्णालयातील डॉक्टरने तपासून प्रशांतला मृत घोषित केले.

प्रशांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात आणला होता. या घटनेची नोंद कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघात