अजित पवार यांची पुन्हा दांडी
By Admin | Updated: May 20, 2017 04:54 IST2017-05-20T04:54:03+5:302017-05-20T04:54:03+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडच्या काळातील दुसऱ्या जाहीर सभेला दांडी मारल्याने भिवंडीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

अजित पवार यांची पुन्हा दांडी
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडच्या काळातील दुसऱ्या जाहीर सभेला दांडी मारल्याने भिवंडीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली असतानाच भिवंडीने मला आमदार करुन ओळख मिळवून दिली मात्र या शहराकरिता मी काहीच केले नाही, अशी जाहीर कबुली समाजवादी पार्टीचे नेते अबू असीम आझमी यांनी शुक्रवारी जाहीर सभेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पार्टी आघाडीची संयुक्त प्रचार सभा शुक्रवारी मंगळवार बाजार स्लॅब येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अजित पवार यांनी पुन्हा दांडी मारली. यावेळी आझमी म्हणाले, पालिकेची एकदा हिंदू- एकदा मुस्लिम महापौराची प्रथा काँग्रेसने मोडली. शिवसेनेला सहकार्य करून त्यांचा महापौर बसवला.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी-सपा आघाडीची सत्ता आल्यावर शहराचा कायापालट होईल.