शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलक संगणक चालकांच्या पुनर्नियुक्तीचा मार्ग खडतर; पालिकेकडून पुनर्नियुक्तीसाठी परीक्षेचा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 19:44 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेत ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या ६७ संगणक चालक व १ लघुलेखकाने २२ जानेवारीपासून सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेत ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या ६७ संगणक चालक व १ लघुलेखकाने २२ जानेवारीपासून सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यांना त्वरित कामावर रुजू होण्याचे आदेश प्रशासनाने दिले असले तरी त्यांनी त्याला प्रतिसाद न दिल्याने त्यांचा पुनर्नियुक्तींचा मार्ग सध्या खडतर झाल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र त्यांना पुन्हा सेवेत घ्यायचे ठरल्यास परीक्षेचा फंडा अंमलात आणण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.पालिकेने कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या ८७ संगणक चालक व ४ लघुलेखकाला २८ जुलै २००७ रोजी ठोक मानधनावर ५ महिन्यांकरिता सामावून घेतले. त्यांना तत्कालीन महासभा व स्थायी समितीने सतत मुदतवाढ दिल्याने प्रशासनाने त्यांच्या सेवेत १ दिवसाचा तांत्रिक खंड देऊन त्यांची नियुक्ती कायम ठेवली. गेल्या १० वर्षांपासून ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांपैकी दरम्यानच्या काळात २० संगणक चालक व ३ लघुलेखकांनी ठोक मानधनावरील नोकरी सोडली.उर्वरित ६७ संगणक चालक व १ लघुलेखकाने सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्याची मागणी प्रशासनाकडे लावून धरली. परंतु प्रशासनाने त्याला सतत खो घातला. अखेर ४ जानेवारी २०१७ रोजी त्यांची मुदतवाढ संपुष्टात येत असल्याने त्यांना मुदतवाढ देण्याऐवजी १९ मे २०१७ रोजीच्या महासभेत सर्वपक्षीयांनी त्या कर्मचाऱ्यांना लिपिक व टंकलेखक वर्ग ३ अनुसार त्यांच्या शिक्षणाची अट शिथिल करून त्यांना सेवेत सामावून घेण्याचा ठराव मंजूर केला. परंतु या ठरावासाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ मधील कलम ५३ (३) नुसार स्थायी समितीची पूर्वपरवानगी अनिवार्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट करून ६ जानेवारी २०१७ पासून त्या कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांकरिता मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव १० फेब्रुवारी २०१७ रोजीच्या स्थायी समिती बैठकीत सादर केला. त्यावर स्थायीने कोणताही ठोस निर्णय न घेता तो विषय येत्या महासभेत पुढील निर्णयासाठी सादर केला जावा, असा ठराव संमत केला. तत्पूर्वी प्रशासनाने २६ जुलै २००६ रोजी संगणक चालक व लघुलेखक यांच्या पदनिर्मितीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला होता. त्याला राज्य सरकारने अमान्य केल्यानेच १९ मे २०१७ रोजी मंजूर करण्यात आलेला ठराव पालिका अधिनियमातील तरतुदीशी विसंगत असल्याचा दावा करीत तो रद्द करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठविल्याचे प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आले. मात्र प्रशासन दिशाभूल करीत असल्याचा आरोप करीत त्या कर्मचा-यांनी २२ जानेवारीपासून श्रमिक जनरल कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान त्यांनी आंदोलन मागे घेऊन कामावर त्वरित हजर राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले. परंतु कर्मचारी सेवेत कायम करण्याच्या मुद्द्यावर अडून बसल्याने प्रशासनाने त्यांची सेवाच खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांना पुन्हा मानधनावर सेवेत घ्यायचे झाल्यास संगणक संबंधित परीक्षा त्यांना अनिवार्य करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर