शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

डम्पिंग ग्राऊंडविरोधात रहिवाशांची निदर्शनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 22:39 IST

डम्पिंग ग्राऊंड तात्काळ बंद करण्याची मागणी 

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेचे अनधिकृत डम्पिंग ग्राऊंड तत्काळ बंद करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र मागणीचा कोणताच विचार होत नसल्याने डम्पिंगचा त्रास सहन करणाऱ्या रहिवाशांनी संघर्ष समिती स्थापन करुन डम्पिंगच्या विरोधात निदर्शने सुरु केली आहेत. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने शेकडो नागरिकांनी एकत्र येऊन डम्पिंग ग्राऊंडच्या विरोधात निदर्शने केले. तसेच या पुढे डम्पिंगवर एकही गाडी येऊ देऊ नये अशी मागणी केली. अंबरनाथ फॉरेस्ट नाका येथे पालिकेचे डम्पिंग ग्राऊंड असून गेल्या 25 वर्षापासून याच ठिकाणी शहरातील कचरा टाकला जात आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून या डम्पिंगवर लागणारी आग नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. सतत हा प्रकार घडत असल्याने दुर्गंधीचा आणि डंपिंगच्या धुराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या डम्पिंग ग्राऊंडविरोधात ग्रीन सिटी, हरी ओम पार्क आणि मोरीवली पार्क भागातील रहिवासी एकवटले असून त्यांनी डम्पिंगविरोधात संघर्ष समिती तयार केली आहे. या समितीच्या माध्यमातून डम्पिंगविरोधात आंदोलने केली जात आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून रविवारी सर्व नागरिकांनी एकत्रित येत कडाडून विरोध केला. डंपिंगवर कचरा टाकू देणार नाही अशी ठाम भूमिका या संघर्ष समितीमार्फत घेण्यात आली आहे. संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात शेकटो रहिवासी सामिल झाले होते. राजकीय पक्षांची मदत न घेता नागरिकांनी एकत्रित येऊन या डम्पिंग ग्राऊंडवर निदर्शने करत प्रशासनाचा निषेध केला.मुळात ज्या सोसायटींना या डम्पिंगचा त्रास होत आहे, त्या सोसायटीने आपला लढा सुरु करताना हे डंपिंग ग्राऊंड अनधिकृत असल्याचे कारण पुढे केले आहे. डम्पिंगचे आरक्षण ज्या जागेवर आहे, त्याच ठिकाणी कचरा हलवण्यात यावा अशी मागणी केली आहे. पालिकेमार्फत सुरु असलेले डम्पिंग ग्राऊंड अनधिकृत असल्याने पालिकेने या ठिकाणी कचरा टाकू नये अशी भूमिका निदर्शनकर्त्यांनी घेतली आहे. मोरीवली पाड्यातूनच हे आंदोलनकर्ते डंपिंग ग्राऊंडपर्यंत पोहोचले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. डम्पिंगरील त्रसाची जाणिव पालिकेला झाल्यावर पालिकेने त्या ठिकाणी माती भराव टाकण्याचे काम सुरु केले आहे. मात्र त्रास अजुनही कमी झालेला नाही. 

टॅग्स :dumpingकचराGarbage Disposal Issueकचरा प्रश्नambernathअंबरनाथ