शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कारवाई केल्याच्या रागातून मदत करणाऱ्या पोलिसालाच धक्काबुक्की: मद्यपी चालकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 21:16 IST

मद्यपी दुचाकीस्वार गाडीवरुन पडल्यानंतर त्याला मदत करणा-या पोलिसाचे आभार मानण्याऐवजी त्यालाच मारहाण करुन शिवीगाळ करणा-या बिपीन पाल (२२) या चालकाला कापूरबावडी पोलिसांनी रविवारी अटक केली आहे.

ठळक मुद्देकापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलआभार मानण्याऐवजी पोलिसाच्या श्रीमुखात लगावलीपोलीस ठाण्यातही घातला गोंधळ

ठाणे: दारुच्या नशेत मोटारसायकल चालवितांना खाली पडलेल्या चालकाला मदतीसाठी गेलेल्या बबन खेडकर (३२) या वाहतूक पोलीस शिपायालाच शिवीगाळी करीत धक्काबुक्की करणा-या बिपीन पाल (२२) या चालकाला कापूरबावडी पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.ठाण्याच्या बाळकूम येथील राहणारा बिपीन हा १ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ठाणे अग्निशमन दलाच्या कार्यालयाकडून कापूरबावडी सर्कलकडे जाणाºया रस्त्याने मोटारसायकलवरुन जातांना खाली पडला. यात त्याच्या तोंडाला आणि हाताला मार लागून तो रक्तबंभाळ झाला. त्यामुळे तिथे वाहतूक नियमनाचे काम करणारे पोलीस शिपाई खेडकर त्याच्या मदतीसाठी धावून गेले. त्याची मोटारसायकल बाजूला घेत असतांना त्याने ‘मेरे पे केस करता है,’ असे बोलून त्यांच्याच श्रीमुखात लगावली. तो आवाक्याच्या बाहेर जात असल्याचे पाहून खेडकर यांनी इतर पोलीस कर्मचा-यांची मदत घेऊन त्याला कापूरबावडी पोलिसांच्या स्वाधीन केले. तिथेही त्याने गोंधळ घालत पोलीस कर्मचा-यांना शिवीगाळ केली. पोलीस ठाण्यातील लोखंडी बाकडाही त्याने आदळला. तसेच महिला पोलीस कर्मचा-यांवरही तो धावून गेला. त्याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा करणे, पोलीस कर्मचा-याला मारहाण करणे, शिवीगाळ करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करुन त्याला अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस