शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शाळा बंदच्या विरोधात प्रशासना विरूध्द समाजिक संघटनांचा संघर्ष !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 23:00 IST

जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील वीसपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या सुमारे ३११ प्राथमिक शाळा बंद करण्याची कारवाई ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून होत आहे.

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील वीसपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या सुमारे ३११ प्राथमिक शाळा बंद करण्याची कारवाई ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून होत आहे. या निर्णया विरोधात श्रमजीवी संघटना व श्रमिक मुक्ती संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून संघर्षाच्या प्रयत्नात आहेत. शाळा बंदच्या निर्णयाविरोधात जिल्हा परिषदेचा निषेधही या संघटनांनी केला आहे.‘ जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी वा-यावर ’ या मथळ्याखाली लोकमतने १९ नोव्हेंबर रोजी वृत्तप्रसिध्द केले असता त्याची दखल घेत समाजिक संघटनांनी प्रशासना विरोधात संघर्षाचा इशारा दिला आहे. ग्रामीण, आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आता शिक्षणाची वाट धरली असून त्यात त्यांच्या शाळा बंद करण्याचा जिल्हा परिषदेने घेतलेला निर्णय हा ‘शिक्षणाचा हक्क’ या कायद्याची पायमल्ली करणार असल्याची जाणीव श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांना करून दिली आहे.जिल्ह्यातील २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊन अंबरनाथ तालुक्यातील सुमारे तीन शाळा शिक्षणाधिकारी मीना यादव शेंडकर यांनी स्वत: जावून बंद केल्या आहेत . या विद्यार्थ्याची शालेय व्यवस्था न करता, वाहन सुविधा विचारात न घेता त्याना वा-यावर सोडून दिले. तेथील शिक्षक पंचायत समितीवर बसवून ठेवले आहेत. जिल्ह्याभरात सुमारे ३११ शाळा बंद करण्याचे प्रयत्न सुरू असतानाही शिक्षणाधिकारी केवळ दहा शाळा बंदची पत्रकारांना खोटी माहिती देऊन राजकारण्यांपेक्षाही जास्त भूलथापा मारण्याचा त्यांचा हात अंखड आनोखा ठरल्याचे उघउ झाले आहे.जिल्ह्यातील शाळा डिजिटल करण्याचा मान मिळवणा-या शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित व निष्काळजीपणामुळे सुमारे ३११ बंद होण्याचे गावखेड्यांवर संकट ओढावले आहे. अंबरनाथ तालुक्यातील काही गावातील महिला व पुरूषांनी सोमवारी गटविकास अधिका-यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. तर सामाजिक संघटनांनी दंड थोपटून जि.प.च्या निर्णयाचा निषेधही नोंदवला आहे. जिल्ह्यातील शहापूरच्या १०९ शाळांसह भिवंडीच्या ५१ शाळा, कल्याणच्या १६, मुरबाडच्या १२० आणि अंबरनाथच्या १७ शाळा बंद करण्याविरोधात श्रमजीवी संघटनेसे श्रमिकमुक्ती संघटना प्रशासना विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी लेखी निवेदन देऊन इशाराही दिलां आहे.

टॅग्स :Schoolशाळाthaneठाणे