वर्षभरानंतर आदिवासींना मिळाली रोहयोची मजुरी
By Admin | Updated: October 5, 2015 00:22 IST2015-10-05T00:22:43+5:302015-10-05T00:22:43+5:30
तालुक्यातील टाकपाडा या गावातील ‘आदिवासी मजूर अडकले आॅनलाइन प्रक्रि येत’ या मथळ्याखालील बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाने तिची

वर्षभरानंतर आदिवासींना मिळाली रोहयोची मजुरी
मोखाडा : तालुक्यातील टाकपाडा या गावातील ‘आदिवासी मजूर अडकले आॅनलाइन प्रक्रि येत’ या मथळ्याखालील बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाने तिची दखल घेऊन ही मजूरी पोस्टात आॅनलाइन जमा केले आहेत.
तालुका कृषी कार्यालयाकडून आदिवासी शेतकऱ्यांनी वृक्षलागवड करावी, यासाठी टाकपाडा गावातील ७ आदिवासी शेतकऱ्यांना ६ सप्टेंबर २०१५ रोजी प्रत्येकी ५०० सागवान झाडांची रोपे याप्रमाणे ३५०० हजार रोपे देण्यात आली होती. त्यामुळे या सागवान रोपांची लागवड करण्यासाठी मनरेगा योजनेंतर्गत ३३ मजुरांना कामावर घेण्यात आले व या मजुरांनी २० दिवस काम करून सागवानच्या रोपांची लागवड करूनही जवळपास वर्षभराचा कालावधी उलटल्यानंतरही मजुरांना कामाचा मोबदला मिळालेला नव्हता. यामुळे रोजगार हमी योजनेच्या मागेल त्याला काम व १५ दिवसांत दाम, या नियमाचे उल्लंघन होऊन आदिवासी मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती.
याबाबत, कृषी कार्यालयाकडे विचारणा केली असता संबंधित कामाचे मस्टर तहसील कार्यालयाकडे पाठवले असल्याचे उत्तर मिळाले. त्यावर, तहसील कार्यालयातील मनरेगा विभागात विचारणा केली असता २ डिसेंबर २०१४ रोजी ही मजूरी पोस्टात आॅनलाइन जमा झाल्याची माहिती मिळाली. मात्र, पोस्ट कार्यालय, मोखाडा येथे विचारणा केली असता आॅनलाइन मजूरी जमा न झाल्याचे समजले. तसेच यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करावा लागेल, असे पोस्ट कार्यालयाकडून सांगण्यात आले. या वेळकाढू व लालफितीच्या कारभाराविरोधात लोकमतने वारंवार आवाज उठविल्याने अखेर प्रशासनाला जाग आली व मजूरी खात्यात जमा झाली.
(वार्ताहर)