शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर मीरा-भाईंदरमध्ये शिंदेसेनेत होणार फेरबदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 06:06 IST

२०१७ च्या निवडणुकीत २२ जागा जिंकलेली शिवसेना यंदा ३० पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या आशेवर होती. मात्र त्यांना केवळ ३ जागा जिंकता आल्या

मीरा रोड - मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत पानिपत झालेल्या शिंदेसेनेत शहरातील सर्व पदांची फेररचना करण्याचा निर्णय संपर्क प्रमुख आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. त्यासाठी जिल्हा स्तरावर चौघांची एक समिती तर प्रभागनिहाय आढावा घेण्यासाठी प्रत्येकी ३ सदस्यांच्या ४ समित्या नेमल्या आहेत.

२०१७ च्या निवडणुकीत २२ जागा जिंकलेली शिवसेना यंदा ३० पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या आशेवर होती. मात्र त्यांना केवळ ३ जागा जिंकता आल्या. तर २८ पेक्षा जास्त जागा भाजपला दोन्ही सेनेतील मराठी मतांच्या विभागणीत जिंकता आल्या. शिंदेसेनेच्या काही जागा तर अवघ्या काही मतांनी पडल्या. मंत्री सरनाईक यांचा एकहाती तंबू कोसळल्यानंतर आता मीरा-भाईदर शिंदेसेनेत मोठे फेरबदल होणार अशी चिन्हे आहेत.

मंत्री सरनाईक यांनी शहरातील शिवसेना संघटन अधिक सक्षम, गतिमान व प्रभावी करण्याच्य दृष्टीने संपूर्ण पदांची फेररचना करण्याचा निर्णय घेण्याचे म्हटले आहे त्यानुसार जिल्हाप्रमुख राजू भोईर, जिल्ह महिला संघटक निशा नार्वेकर, १४५ मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रम प्रताप सिंग आणि युवासेना, ठाण लोकसभा अध्यक्ष पवन घरत यांची जिल्हा समिती बनवली आहे.

प्रभागनिहाय ४ समित्याप्रभागनिहाय ४ समित्या केल्या असून त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधायचा आहे. भाईंदर पूर्वेच्या प्रभाग २,३,४,५,१०,११ साठी १४६ ओवळा माजिवडा विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर आणि पूजा आमगावकरसह युवासेना ठाणे - पालघर निरीक्षक स्वराज पाटील यांना नेमले आहे.

पहिली प्राथमिक बैठकप्रभाग १२,१३, १४, १८ साठी नवीन सिंह, सपना मौर व राजन पांडे यांना नेमले आहे. १४५ मतदार संघातील प्रभाग ९,१५,१६,१७,१९,२०,२१,२२ साठी माजी नगरसेविका डॉ. नयना वसानी, संतोष गोळे, सरिता शिंदे आणि अमन गावंड यांची तर प्रभाग १,६,७,८,२३,२४ साठी कुणाल पुरोहित, तेजस्वी गावंड व मंदार रकवी यांना नेमले आहे. समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून, नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी योग्य नावे संकलित करावीत असे पत्रात नमूद केले आहे. या ५ समित्यांच्या सदस्यांची पहिली प्राथमिक बैठक शुक्रवारी रात्री झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Shake-up in Shinde Sena after Mira-Bhayandar election defeat.

Web Summary : Following a disappointing performance in the Mira-Bhayandar municipal elections, the Shinde Sena plans a major organizational overhaul. Committees have been formed to review and restructure positions at district and ward levels, aiming to strengthen the party's local presence after winning only three seats.
टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा